'कल मेरी शादी है, आज आजादी है...'

नोरा फतेहीचं 'प्यार दो, प्यार लो' गाणं प्रदर्शित   

Updated: Oct 10, 2019, 06:57 PM IST
'कल मेरी शादी है, आज आजादी है...' title=

मुंबई : 'दिलबर' आणि 'साकी साकी' गाण्याच्या यशानंतर अभिनेत्री नोरा फतेही 'प्यार दो प्यार लो' या गाण्याच्या माध्यमातून तिच्या नृत्य अदांनी चाहत्यांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. नोराचं 'प्यार दो प्यार लो' गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. नोराचं हे गाणं अभिनेत्री तारा सुतारिया, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख स्टारर 'मरजावां' चित्रपटातील आहे. 

हे गाणं १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या 'जानबाज' चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'प्यार दो प्यार लो' प्रेरीत होवून साकारण्यात आलं आहे. हे गाणं रेखा यांच्यावर चित्रीत करण्यात आला होतं.  

'मरजावां' चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं आहे. तर निर्मिती भूषण कुमार,निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.