फिफाच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार बॉलिवूडचा तडका, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार परफॉर्म

जेनिफर लोपेझ, शकीरानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला फिफा विश्वचषकात परफॉर्म करता येणार 

Updated: Oct 5, 2022, 08:54 PM IST
फिफाच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार बॉलिवूडचा तडका, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार परफॉर्म  title=

मुंबई : फिफा वर्ल्डकप 2022 ला (FIFA World Cup) येत्या 20 नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपची (FIFA World Cup) प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या फिफा वर्ल्डकपमध्ये बॉलिवूडचा तडकाही पाहायला मिळणार आहे. कारण या फिफाच्या वर्ल्डकपमध्ये एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.  

बॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने (Nora Fatehi) आपल्या नृत्याने भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. आता लवकरच ती एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर परफॉर्म करताना दिसणार आहे.

नोरा फतेहीला (Nora Fatehi) फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) डान्स परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्टार जेनिफर लोपेझ,(Jennifer Lopez)  शकीरा (Shakira) यांच्यानंतर आता ग्लोबल आयकॉन नोरा फतेही (Nora Fatehi)  फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करणार आहे. डिसेंबरमध्ये फिफा मंचावर ती भारताचे आणि विशेषतः दक्षिण-पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. 

नोरा (Nora Fatehi) यंदाच्या फिफामध्ये (FIFA World Cup) डा गाणी गाताना आणि डान्स परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. हे गाणे RedOneने तयार केले आहे, जो इतिहासातील सर्वात प्रभावशाली रेकॉर्ड उत्पादकांपैकी एक आहे. RedOne ने अनेक वर्षांपासून FIFA साठी गाण्यांवर काम केले आहे. त्याने शकीराची वाका वाका आणि ला ला ला गाणी रचली होती.जे पुढे जाऊन खुप प्रसिद्ध झाली होती.