प्रभास नव्हे, भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत 'देवसेना'

अनुष्का शेट्टीपेक्षा तिची देवसेना हीच ओळख प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली 

Updated: Feb 11, 2020, 12:27 PM IST
प्रभास नव्हे, भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत 'देवसेना' title=
अनुष्का शेट्टी

मुंबई : 'बाहुबली' आणि 'देवसेना' ही दोन पात्र साकारत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अभिनेता प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आले. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री जितकी गाजली, तितकीच किंबहुना त्याहून जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री. पण, आता मात्र या दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली आहे. 

गेल्या बऱ्याच काळापासून अनुष्का आणि प्रभास यांच्या नात्याविषयी फार चर्चा झाली नाही. 'रिपलब्लिक वर्ल्ड'च्या वृत्तानुसार ते दोघं आता एकत्र नसून, अनुष्का या नात्यापासून बरीच पुढेही गेली आहे. सध्या ती भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. 

अनुष्का आणि त्या क्रिकेटपटूचा साखरपुडाही झाला असल्याचं वृत्त आहे. इतकच नव्हे, तर त्यांच्या लग्नाची तयारीही सुरु झाल्याचं कळत आहे. हा क्रिकेटपटू दक्षिण भारतीय नसून, तो मुळचा उत्तर भारतातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता हा खेळाडू कोण, असाच प्रश्न कला आणि क्रीडा रसिकांच्या मनात घर करु लागला आहे. 

अनुष्का शेट्टी आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणारा हा खेळाडू यंदाच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडककण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता तो नेमका कोणता खेळाडू?, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. अमुक एका खेळाडूसोबत अनुष्काचं नाव जोडलं गेल्यानंतर तीसुद्धा विराट कोहली- अनुष्का शर्मा, हरभजन सिंग- गीता बसरा, हार्दीक- नताशा स्टॅन्कोविक अशा सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत गणली जाऊ शकते. 

येत्या काळात अनुष्का 'निशब्दम' या चित्रपटातून झळकणार आहे. तामिळ आणि तेलुगू अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हेमंत मधूकर दिग्दर्शित या चित्रपटातून आर. माधवन, अंजली, मायकल मदेसन, सुब्बराजू, शालिनी पांडे आणि श्रीनिवास अवसारला मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.