'नोटबुक'च्या टीमकडून शहीदांना 22 लाखांची मदत, सिनेमातून अतिफ असलम बाहेर

बॉलिवूड मंडळींनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला. त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांना भारतातून बॅन करण्यात येत आहे. 

Updated: Feb 19, 2019, 03:52 PM IST
'नोटबुक'च्या टीमकडून शहीदांना 22 लाखांची मदत, सिनेमातून अतिफ असलम बाहेर title=

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. शहीद जवानंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हात पुढे सरसावत आहेत. बॉलिवूड मंडळींनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला. त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांना भारतातून बॅन करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्यामाहिती नुसार अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शन खाली तयार होत असलेला सिनेमा 'नोटबुक'च्या टीमने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला 22 लाख रूपये मदत म्हणून देण्याचे घोषित केले त्याचप्रमाणे पाकिस्तानी गायक अतिफ असलमला सिनेमातून बेदखल करण्यात आले आहे. 
 
सलमान खानने पाकिस्तानी कलाकार अतिफ असलमला काढण्याचे आदेश आपल्या प्रोडक्शन टीमला देवून गाण्याचे पून्हा नव्याने रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आहे. याआधी अतिफ असलमने सलमानच्या 'टायगर जिंदा हैं' सिनेमातील 'दिल दिया गल्ला' हे गाणे गायले होते. या गाण्याला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली होती.
 
'नोटबुक' सिनेमाचा काही भाग काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आला. शूटिंग फक्त जवान अणि काश्मिरी लोकांमुळे याशस्वी झाली. कठीण परिस्थितीत सुद्धा भारतीय जवानांनी आम्हाला सुरक्षित ठेवले. देशाच्या रक्षणासाठी या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहता यावे अशी कामना सलमान खान आणि त्याच्या प्रोडक्शन टीमने केली.