Katrina ला ऑफ कॅमेरा Kiss करत होता गुलशन ग्रोव्हर, अमिताभ बच्चन यांनी दोघांना पकडलं रंगेहात

गुलशन ग्रोवरची अवस्था खूपच वाईट झाली होती.

Updated: Jan 19, 2022, 03:04 PM IST
Katrina ला ऑफ कॅमेरा Kiss करत होता गुलशन ग्रोव्हर, अमिताभ बच्चन यांनी दोघांना पकडलं रंगेहात  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनेअनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम देखील केलं आहे. मात्र, कतरिनावर एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. अभिनेत्री कतरिनाने 2003 साली बूम या चित्रपटातून पदार्पण केले. दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत होता.

या चित्रपटातील एका दृश्यात कतरिनाला गुलशन ग्रोवरसोबत किसिंग सीन करायचा होता. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या घटनेबद्दल आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

खुद्द गुलशन ग्रोवरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो किसिंग सीन करण्यासाठी खूप घाबरला होता. त्याचा हा पहिला किसिंग सिन असल्यामुळे काय करावं हे त्याला कळत नव्हतं. यासाठी बंद खोलीत त्याने कतरिनासोबत सरावही केला.

गुलशनने सांगितले की, तो सराव करत असताना अमिताभ बच्चन रूममध्ये आले आणि त्यांनी हे सर्व पाहिले. त्यावेळी बिग बींनी त्याला प्रोत्साहन दिले असले, तरी गुलशन ग्रोवरची अवस्था खूपच वाईट झाली होती.

कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात चित्रित केलेला हा सीन चांगलाच व्हायरल झाला होता. याबद्दल बोलताना कतरिना अभिनेत्री नेहमी म्हणते की, "हा सीन मी स्वत: केला होता आणि या गोष्टीला मी नाकारत नाही, परंतु त्यावेळेला मी फारच अस्वस्थ होती."

त्याचवेळी गुलशन यांनी असेही म्हटले होते की, आम्ही कलाकार आहोत. ''मी बराच काळ या इंडस्ट्रीत काम करत आहे. मी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. एखाद्या कलाकाराने कोणतेही काम केले असेल, तर त्यावर माझा विश्वास आहे. त्याचा एखादा फोटो काढला. व्हिडीओ तयार करण्यात आला. त्यामुळे तो इतिहास बनतो. त्यानंतर या गोष्टी दाबून ठेवण्यात काही उपयोग नाही.''

कतरिना कैफने गेल्या वर्षी विकी कौशलसोबत लग्न केले होते. सध्या तो तिच्या आगामी चित्रपट टायगर 3 च्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.