मी इथे मेहनतीने पैसे कमवतोय आणि तू... अभिषेकवर बिग बी संतापले

तिथे त्याचं वडिलांसोबतचं खरंखुरं नातं जगासमोर आलं.   

Updated: Apr 6, 2022, 03:20 PM IST
मी इथे मेहनतीने पैसे कमवतोय आणि तू... अभिषेकवर बिग बी संतापले title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'दसवीं' (Dasvi) या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता अभिषेक बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तो सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतोय. अशाच एका ठिकाणी अभिषेक पोहोचला आणि तिथे त्याचं वडिलांसोबतचं खरंखुरं नातं जगासमोर आलं. (Abhishek bachchan Amitabh bachchan)

अभिषेकच्या अपयशामुळं बिग बी एकेकाळी त्याच्यावर इतके चिडले की त्यांनी त्याला खडे बोल सुनावले होते. खुद्द अभिषेकनंच ही आठवण शेअर केली.

स्वित्झर्लंडला एका वसतीगृह शाळेमध्ये असताना कायमच आपल्याला वाईट गुण मिळत असल्याचं अभिषेकनं सांगितलं. परिणामी अभिषेत घरी कायमच पोस्टमनची वाट पाहायचा. जेणेकरून निकाल येत्याक्षणीच तो लपवता येईल. 

एक दिवस बिग बिंनी ऑफिसमधून घरातील इंटरकॉमवर फोन केला. तेव्हा त्यांच्या हातात अभिषेकचा निकाल होता. तिथे बिग बींनी अभिषेकचा निकाल वाचण्यास सुरुवात केली. 

आता आपली खैर नाही, या भीतीनं अभिषेकच्या मनात घर केलं. निकाल त्यांच्यापर्यंत गेला तरी कसा हाच प्रश्न त्यांना पडू लागला होता. 

निकाल पाहून काय म्हणाले बिग बी ?
मुलाच्या शालेय कामगिरीवर अमिताभ बच्चन रागवले होते. पण, या क्षणी त्याला रागे न भरता त्यांनी त्याला परिस्थिती समजावून सांगितली. आम्ही इतक्या मेहनतीनं पैसे कमावतो, तुम्हाला शिकवतो, पण याचा हा अर्थ नाही की तू अशीच दंगामस्ती करत राहशील. तुला जबाबदारी समजून घ्यावी लागेल, असं ते अभिषेकला म्हणाले. 

आपण पैसे कमवत असतानाच मुलाला आपल्या कष्टांची जाणीव असायलाच हवी, यासाठीच बच्चन त्यावेळी आग्रही दिसले. ज्यामुळं सहाजिकच एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर याचे बरेच परिणाम दिसून आले.