आत्महत्यांचं सत्र सुरुच; अभिनेत्रीनं राहत्या घरी संपवलं आयुष्य

एकदा कलाविश्वला हादरा... 

Updated: Aug 7, 2020, 07:26 PM IST
आत्महत्यांचं सत्र सुरुच; अभिनेत्रीनं राहत्या घरी संपवलं आयुष्य
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास दर दिवशी एका वेगळ्या वळणावर येत आहे. असं असतानाच आता सुशांतमागोमाग समीर शर्मा या टीव्ही कलाकारानंही आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. आत्महत्यांचं हे सत्र इतक्यावरच थांबलेलं नाही, कारण आता एका अभिनेत्रीनं आपलं आयुष्य संपवल्याची खळबळजनक माहिती पुन्हा एकदा कलाविश्वला हादरा देत आहे. 

भोजपुरी कलाविश्वा आणि मालिका विश्वामध्ये आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री अनुपमा पाठक हिनं मुंबईतील मीरारोड परिसरात राहत्या घरी आत्महत्या केली. २ ऑगस्टलाच तिनं आत्महत्या केली होती. मीरारोड येथील म्हाडा निवासी संकुलामध्ये राहत्या घरी तिचा गळफास लावलेला मृतदेह आढळला होता. 

सदर प्रकरणी भारतीय दंडसंविधानाअंतर्गत कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली. 

Bhojpuri actress Anupama Pathak dies by suicide, police suspect she felt 'cheated'

अनुपमानं आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये आपली फसवणुक झाल्याची भावना तिनं बोलून दाखवली होती. शिवाय यापुढं आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, असंही ती या व्हिडिओमध्ये म्हणाली होती. फेसबुक पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तिनं विश्वास, त्याच्याशी संबंधीत काही गोष्टी आणि गरजेच्या वेळी मदत करणाऱ्या मित्रमंडळींचा अभाव यावर भाष्य केलं होतं. 

'पीटीआय'च्या वृत्तानुसार पती काही कामासाठी बाहेर गेले असता अनुपमानं हे टोकाचं पाऊल उचललं. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे. तिच्या कोणा एका मित्रमैत्रीनं तिची दुचाकी परत केली नव्हती त्यामुळं आपली फसवणुक झाल्याची भावना तिच्या मनात घर करत होती. तर, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात तिच्याकडे कामाचाही अभाव होता. शिवाय आर्थिक अडचणीचाही तिला सामना करावा लागला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे. मुळची बिहारची असणारी अनुपमा मुंबईत तिची स्वप्न