मालिकेत दीर आणि वहिनीची भूमिका साकारणारे 20 वर्षांपासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये, पण 'या' कारणामुळे नाही झालं लग्न

हे कपल 20 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Updated: Aug 21, 2022, 05:03 PM IST
मालिकेत दीर आणि वहिनीची भूमिका साकारणारे 20 वर्षांपासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये, पण 'या' कारणामुळे नाही झालं लग्न title=

मुंबई : आजकाल सेलिब्रिची लग्नााधी लिव्ह-इन रिलेशनशिप राहतात. त्यानंतर काही काळात ते लग्न करतात. पण छोट्या पडद्यावरील एक असं कपल आहे, जे जवळपास 20 वर्षांपासून लग्न न करता लिव्ह-इनमध्ये राहत आहे. एवढंच नाही तर त्यांचा लग्नाचा प्लॅन देखील नाही, ना मुलांसाठी कोणती प्लॅनिंग. आश्लेषा सावंत (Ashlesha Savant) आणि संदीप बसवाना (Sandeep Baswana) असं या कपलचं नाव आहे. 

या दोघांनी एका सीरियलमध्ये एकत्र काम केलं होतं आणि पडद्यावर दोघांनी वहिनी आणि दीराची भूमिका साकारली होती. संदीप आणि अश्लेषा यांनी 'क्‍योंकि... सास भी कभी बहू थी' या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत या दोघांची भूमिका वहिनी आणि दीराची होती. या मालिकेच्या सेटवर दोघांची आधी मैत्री झाली, नंतर प्रेम झालं आणि तेव्हापासून दोघेही लग्नाशिवाय एकत्र राहत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या जोडप्यानं सांगितले की ते लग्नाशिवाय सुखी आहेत आणि पुढे लग्न करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. 

संदीप आणि आश्लेषा सावंतची पहिली भेट ही कमल मालिकेच्या सेटवर झाली होती. पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात ही 'क्‍योंकि... सास भी कभी बहू थी' च्या सेटवर झाली. या मालिकेत अश्लेषानं तिशा मेहता विराणीची तर संदीपनं साहिल विराणीची भूमिका साकारली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संदीप, म्हणाले 'आम्ही 20 वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आमचं लग्न झालं नाही पण नवरा-बायकोचं नातं आहे पण त्याहूनही जास्त.' प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफवर संदीप म्हणाले, 'आम्ही एकाच प्रोफेशनचे असल्याने आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. एकमेकांच्या गरजांचीही काळजी घेतो.'

प्रेमावर बोलताना संदीप म्हणाले की, आम्ही एकमेकांना वचन दिलं आहे की आम्ही असेपर्यंत एकमेकांसोबत राहू. आमचे एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर असाच राहील.' पुढे ते म्हणाले, 'मी लग्नाच्या विरोधात आहे. माझा असा विश्वास आहे की आयुष्यात दोन व्यक्तींनी एकत्र राहावे तोपर्यंतच जोपर्यंत प्रेम आहे आणि प्रेम संपले तर एकत्र राहण्याचा अर्थ उरत नाही.'

कुटुंब नियोजनावर बोलताना संदीप म्हणाले की, 'लोकसंख्या खूप वाढत आहे, जगात खूप मुलं आहेत, त्यामुळे आपणही याचा विचार करायला हवा आणि म्हणूनच आम्हाला मुलं नको आहेत.'