PHOTO : मुसळधार पावसानंतर 'मिम्स'च्या पुरात बीग बीही सहभागी

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर ट्विटरवरही मिम्सचा पाऊसच पडला म्हणा ना...

Updated: Jul 2, 2019, 09:20 PM IST
PHOTO : मुसळधार पावसानंतर 'मिम्स'च्या पुरात बीग बीही सहभागी title=

मुंबई : मुंबईच्या या जलमय परिस्थितीवर अमिताभ बच्चन यांनीही ट्विट केलंय... अमिताभ बच्चन यांचे जुहूमध्ये जलसा आणि प्रतीक्षा असे दोन बंगले आहेत. जुहूमध्येही प्रचंड पाऊस झाला. या परिस्थितीवर अमिताभ यांनी 'जलसा होते हुए', असं म्हणत होडीमधला फोटो पोस्ट केलाय.

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर ट्विटरवरही मिम्सचा पाऊसच पडला म्हणा ना... नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हिटिला उधाण आलं... आणि पावसाची वेगवेगळी रुपं सोशल मीडियावरही दिसू लागली.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईच्या पूरस्थितीची पाहणी केली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. तिथून त्यांनी विविध भागांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील नंतर आपत्कालीन कक्षात भेट देऊन माहिती घेतली. मुंबईची तुंबई झाली असताना महापौर पाहणी करण्यासाठी आले नव्हते. अनेक तासांनंतर त्यांनी माहिती घेतली.