दीपिका पदुकोणच्या लग्नाचे होतेय जबरदस्त प्लानिंग

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलीवूडमध्ये आता लग्नाचा सीझन सुरु झालाय असे वाटतेय.

Updated: Apr 13, 2018, 08:44 AM IST
दीपिका पदुकोणच्या लग्नाचे होतेय जबरदस्त प्लानिंग title=

मुंबई : गेल्या वर्षी अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलीवूडमध्ये आता लग्नाचा सीझन सुरु झालाय असे वाटतेय. विराट-अनुष्काच्या लग्नानंतर श्रेया सरण, वीजे पूरब कोहली, सुरवीन चावला, आशिका गोराडिया, इशिता दत्ता-वत्सल सेठ आणि अमृता पुरी सारख्या स्टार्सने लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या वर्षाच्या अखेरपर्यंत लग्न बंधनात अडकू शकतात. दोघांनी लग्नाची तयारीही सुरु केलीये. दीपिका पदुकोण काल मुंबईहून बंगळूरुला तयारीसाठी गेलीये.

कोण करतयं खास तयारी

बॉलीवूडच्या या गुडलुकिंग कपलच्या लग्नाची तयारीही सुरु आहे. मात्र रणवीर-दीपिका वगळता आणखी एक अशी व्यक्ती आहे जी दीपिकाच्या लग्नासाठी खास तयारी करतेय. 

दीपिका आहे ब्रँड अॅम्बेसिडेर

दीपिका पदुकोण एका ज्वेलरीची ब्रँड अॅम्बेसिडेर आहे. हा ब्रँड दीपिकाच्या लग्नासाठी एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी कलेक्शन लाँच करणार आहे. हा ब्रँड दीपिकासाठी जेवर डिझाईन करणार. पद्मावतमध्येही दीपिका पदुकोण प्रत्येक जेवरमध्ये छान दिसली होती. 

याआधी असे घडले नव्हते

याआधी अनेक सुपरस्टार अभिनेत्रींनी लग्न केले ज्या ज्वेलरी ब्रँडच्या  ब्रँड अॅम्बेसिडेर होत्या. मात्र असे सरप्राईज पहिल्यांदा घडतेय.

तयारीमध्ये रंगलय कुटुंब

असं म्हटलं जातंय की दीपिका पदुकोणचे कुटुंब डिझाईनसाठी त्या टीमशी चर्चा करतंय. दरम्यान, दीपिकाच्या लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्यांच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंबिय तयार झाले असून या वर्षाच्या अखेरीस ते लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय.