अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

लोकसभा निवडणूक २०१९ च्या दृष्टीने प्रदर्शनाच्या काही दिवस आधी निवडणूक आयोगाकडून चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. 

Updated: May 3, 2019, 02:30 PM IST
अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली title=

मुंबई : बॉलिवूड बायोपिक चित्रपट 'पीएम नरेंद्र मोदी' येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जगभरात ११ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता परंतु लोकसभा निवडणूक २०१९ च्या दृष्टीने प्रदर्शनाच्या काही दिवस आधी निवडणूक आयोगाकडून चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता २४ मे रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शित होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

चित्रपटाचे निर्माते संदीप एस सिंह यांनी 'एक जबाबदार नागरिक होण्याच्या नाते देशातील न्यायव्यवस्थेचा आदर करतो. अनेक गोष्टीबाबत चर्चा केल्यानंतर चित्रपट लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतरच प्रदर्शित करणार असून आता चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित करणार असल्याचं' त्यांनी सांगितलं. 

इस दिन रिलीज होगी 'पीएम नरेंद्र मोदी', दिखाई जाएगी 2014 के चुनावों की ऐतिहासिक जीत

चित्रपटात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अमित शाह यांची भूमिका अभिनेता मनोज जोशी साकरणार आहेत. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता, अक्षत आर सलूजा प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि आचार्य मनीष यांनी चित्रपटाची निर्मीती केली आहे.