पूनम पांडेने शेअर केला टॉपलेस फोटो...

पूनम पांडने सोशल मीडियावर पुन्हा एकदा हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. 

Updated: May 9, 2018, 12:27 PM IST
पूनम पांडेने शेअर केला टॉपलेस फोटो... title=

मुंबई : आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने नेहमी चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडने सोशल मीडियावर पुन्हा एकदा हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूनम पांडेने शेअर केलेला हा नवा टॉपलेस फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. फोटोतील तिचा बोल्ड अंदाज दंग करणारा आहे.

पूनम पांडेने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर स्वतःचा टॉपलेस फोटो शेअर केला. इतकंच नाही तर पूनम पांडेने या फोटोला चाहत्यांकडून कॅप्शन मागितले आहे. फोटो शेअर करत तिने लिहीले की, मला या फोटोसाठी कॅप्शन द्या. पूनम पांडे सातत्याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर स्वतःचे हॉट फोटोज शेअर करत असते. अनेकदा आपल्या हॉट फोटोज, व्हिडिओज आणि वक्तव्यांमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते. तर बरेचदा युजर्सकडून वाईट, अश्लिल कमेंट्स येतात. तर कधी तिची खिल्ली उडवली जाते.

 

Give me a caption for this pic. 

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

२०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पूनम पांडेचे नाव अचानक चर्चेत आले. कारण तेव्हा तिने टीम जिंकल्यानंतर न्यूड होणार असल्याचे वचन दिले होते. मात्र बीसीसीआयने तिला असे करण्यास परवानगी दिली नाही. मात्र २०१६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पूनमने सेमी न्यूड फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. तिने नशा सिनेमात काम केले आहे.