Pornography Case | राज कुंद्राला मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन

पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case ) अटकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty ) पती राज कुंद्राला (Raj Kundra) मोठा दिलासा मिळाला आहे.   

Updated: Sep 20, 2021, 06:06 PM IST
Pornography Case | राज कुंद्राला मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन

प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) अटकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला 19 जुलैला रात्री उशीरा अटक करण्यात आली होती.  (Pornographic case Mumbai Court grants bail to shilpa shetty husband  Raj Kundra )  

राज कुंद्रासह त्याचा साथीदार असलेला रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे. रायनला या पॉर्नोग्राफी प्रकरणी रायगडमधून अटक केली गेली होती. रायन हा राज कुंद्राच्या आयटी कंपनीचा हेड होता. रायन हा शिल्पा शेट्टीच्या मर्जीतला समजला जातो.    

2 महिन्यांनंतर जामीन

राज कुंद्राला अश्लील व्हीडिओ बनवण्याप्रकरणी आयपीसीच्या विविध कलमांनुसार आणि आयटी एक्टनुसार अटक करण्यात आली होती. 19 जुलैला अटक त्यानंतर आज 20 सप्टेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली म्हणजेच 2 महिन्यांनी राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. या प्रकरणी राज कुंद्राने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्रा त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर काही स्पष्टीकरण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.