'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न

Prajakta Mali चे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Updated: Jan 20, 2023, 11:13 AM IST
'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न title=

Prajakta Mali Bold Photo : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय आहे. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra ) मधून प्राजक्ता एक उत्तम सुत्रसंचालिका म्हणून दिसत आहे. आता प्राजक्ता एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, प्राजक्तानं नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं निळ्या रंगाचा शिमरी ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. प्राजक्ताचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्राजक्ताचे फक्त वेस्टर्न लूक नाही तर तिचं पारंपारिक लूकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. दरम्यान, नुकत्याच शेअर केलेल्या शिमरी ऑफ शोल्डर लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ड्रेस वापरुन झाल्यावर तो हातावरचा फुगा मला द्या बर्थ डे ला लावतो माझ्या.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं असा प्रश्न देखील विचारला आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या आऊट फिट वरही कुंकू लावायला हरकत नाही नवीन फॅशन तू सुरू कर.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आरे... कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू' अशा अनेक कमेंट काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 

हेही वाचा : Alaya F Bold Photo: आलिया एफचा ब्लॅक ड्रेसमधील बोल्ड लूक पाहिलात का? जान्हवी, सारा आणि नोरालाही टाकते मागे

प्राजक्ताने काहीच दिवसांपूर्वी अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या नवीन वेबसाईटचे महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. 'प्राजक्तराज' असं या वेबसाईटचं नाव आहे. काहीच महिन्यांपूर्वी प्राजक्ताने 'प्राजक्तप्रभा' हे तिच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची एक जूनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये प्राजक्तानं खुलासा केला की तिनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) काम केले आहे. प्राजक्ता शाहरुखच्या स्वदेश (Swades Movie) या चित्रपटात प्राजक्ताने काम केलं आहे. हे ऐकून आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे. या चित्रपटात प्राजक्ताने अगदी छोटंसं काम केल्याचे दिसून आले आहे.