प्रत्येक रविवार कसा असायला हवा सांगत; प्राजक्ता माळीनं शेअर केला खास व्हिडीओ

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर हास्यजत्रेच्या टीमसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 13, 2023, 02:03 PM IST
प्रत्येक रविवार कसा असायला हवा सांगत; प्राजक्ता माळीनं शेअर केला खास व्हिडीओ title=
(Photo Credit : Prajakta Mali Instagram)

Prajakta Mali : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सगळ्यांची लाडकी आहे. प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या प्रेक्षक हे तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. या शोची सगळेच प्रतिक्षा करताना दिसत आहेत. काल प्राजक्तानं हास्यजत्रेच्या टीमनं तिचा वाढदिवस किती आनंदानं साजरा केला ते सांगितलं. त्याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. आता तिनं प्रत्येक रविवार कसा असला पाहिजे हे सांगत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हास्यजत्रेची संपूर्ण टीम सुट्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. याची सुरुवात ही स्विमिंग पूलपासून होते. ते सगळे स्विमिंग पूलमध्ये उडी घेताना दिसत आहेत. तर त्यानंतर ते सगळे एकत्र पोज देखील देतात. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की प्रत्येक रविवार हा असाच असला पाहिजे. महाराष्ट्राची हास्यजत्रेची संपूर्ण टीम ही प्राजक्ताच्या कर्जतच्या फार्महाऊसवर गेली आहे. त्यांच्या मागे असलेला सुंदर निसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : महाराष्ट्राचे राजकारणी गलिच्छ म्हणत कोकण हार्टेड गर्ल भावूक

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'पूर्ण महाराष्ट्राला हसवणारे बिना लॉजिक च हसत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'गौरव मोरे अस का म्हणाले ते आत्ता समजल :- रसिका वेगुर्लेकर मंद बदक.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम लोकांनी डोक्यावर उचलून धरण्याचे एकमेव कारण म्हणजे केवळ आणि केवळ प्राजक्ता. पुन्हा एकदा येत्या सोमवारपासून.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे भगवंता लय भारी बाबा तुमची मजा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रविवारचा आनंद लुटण्याचा खूप छान मार्ग. आनंद घेत राहा'. तर एका नेटकऱ्यांनी हास्यजत्रेची प्रतिक्षा करत असल्याचं सांगत म्हटला, 'तुम्ही इथे आहात मग एपिसोड कोण बनवले. इथे आमचं हसणं बंद झालयं.'