अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या एका पोस्टमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) संबंधी एक पोस्ट केली असून, त्यातील कार्टून पाहून अनेकजण संतापले आहेत. यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण यावेळी त्यांनी चांद्रयान 3 ला मधे आणल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली. दरम्यान, ही टीका होत असतानाच प्रकाश राज यांनी नव्यान ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
संपूर्ण भारत सध्या 23 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे. याचं कारण म्हणजे याच दिवशी दुपारी 5 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. ISRO च्या या मोहिमेकडे फक्त भारतीय नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्यातच रशियाचं Luna 2 अपयशी झाल्याने, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण यादरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 ची खिल्ली उडवल्याने नेटकरी नाराज झाले.
प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं कार्टून शेअर केलं होतं. या फोटोत के सिवन शर्ट आणि लुंगी घातलेले असून हातात चहा दिसत आहे. थोडक्यात, प्रकाश राज यांनी त्यांना चहावाला दाखवलं आहे. हे कार्टून शेअर करताना प्रकाश राज यांनी चंद्रावरुन आलेले पहिले फोटो असा टोला लगावला. 'विक्रम लँडरने चंद्रावरुन पाठवलेला पहिला फोटो,' असं प्रकाश राज यांनी लिहिलं होतं.
यानंतर नेटकरी संतापले आणि प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील हा अंध द्वेष असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली.
प्रकाश राज यांनी टीकेला उत्तर देताना, द्वेषाला फक्त द्वेषच दिसतो असं म्हटलं आहे. मी आमच्या केरळच्या चहावाल्याचं सेलिब्रेशन करत आहे असंही ते म्हणाले आहेत. "द्वेषाला फक्त द्वेष दिसतो. मी #Armstrong टाइम्सच्या एका विनोदाचा संदर्भ देत होतो. आमच्या केरळच्या चहावाल्याचं मी सेलिब्रेशन करत आहे. कोणत्या चहावाल्याला यात ट्रोलिंग दिसलं? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर तो तुमच्यावर असतो. मोठे व्हा #justasking," असं उत्तर प्रकाश राज यांनी दिलं आहे.
Hate sees only Hate.. i was referring to a joke of #Armstrong times .. celebrating our kerala Chaiwala .. which Chaiwala did the TROLLS see ?? .. if you dont get a joke then the joke is on you .. GROW UP #justasking https://t.co/NFHkqJy532
— Prakash Raj (@prakashraaj) August 21, 2023
ISRO ने ट्वीट करत हे लँडिग कुठे, कधी आणि कसं पाहता येईल याची माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला बंगळुरुच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये (Mission Control Centre) जाण्याची गरज नाही.
ISRO ची वेबसाइट - https://www.isro.gov.in/
YouTube - https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook - https://www.facebook.com/ISRO
किंवा डीडी नॅशनल टीव्हीवरही तुम्ही हे लाईव्ह पाहू शकता.