अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वेला पुत्ररत्न, फोटो शेअर केला

हा प्रवास खूप सुखकर आहे... व्यक्त केली भावना 

Updated: Sep 2, 2020, 09:52 AM IST
अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वेला पुत्ररत्न, फोटो शेअर केला  title=

मुंबई : अभिनेत्री आणि पार्श्वगायिका म्हणून प्रियांका बर्वे ओळखली जाते. 'मुंबई पुणे मुंबई २', 'डबल सिट', 'अजिंठा' सारख्या सिनेमांमध्ये प्रियांका बर्वेने पार्श्वगायन केलं आहे. अनेक टीव्ही मालिका आणि संगीत नाटकातही प्रियांकाचा मधुर आवाज आपण ऐकला आहे. नुकताच इंस्टाग्रामवर प्रियांकाने आपल्या बाळासोबतचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. 

प्रियांकाने २० ऑगस्ट रोजी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रियांका आपला नवरा सारंग कुलकर्णी आणि बाळासोबतचा फोटो शेअर करून 'आनंदी कुटुंबाचं चित्र मांडल आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो. या दोघांनी आपल्या मुलाचं नाव 'युवान' असं ठेवलं आहे. याचा अर्थ सुदृढ आणि चिरतरूण. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sharing the most precious joy of our lives. We were blessed with a baby boy on 20.08.2020. From now onwards he shall be called as YUVAAN SARANG KULKARNI  Need your blessings and love.

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve) on

प्रियांकाने काही दिवसांपूर्वी बेबीबंपचे फोटो देखील शेअर केले होते. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे. तिच्या चाहत्यांनी, सहकाऱ्यांनी तिच्या बाळाला शुभाशिर्वाद दिले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It has been a beautiful journey.  #throwbacktothe6thmonth #motherhood #pregnancydiary #throwback  @sarangsarod

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve) on

बेबीबंपचा फोटो शेअर करत हा प्रवास अतिशय सुखकर आहे, अशी भावना व्यक्त केली होती. प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्व हे खास असतं. तिला प्रगल्भ करणारं हे नातं असतं. मातृत्वाचा आनंद प्रियांका बर्वेच्या चेहऱ्यावर दिसत आहे.