close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करवाचौथच्या दिवशी निकची भावूक पोस्ट

आजपर्यंत तिचा धर्म आणि संस्कृतीविषयी तिने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.

Updated: Oct 18, 2019, 04:58 PM IST
करवाचौथच्या दिवशी निकची भावूक पोस्ट

मुंबई: देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पत्नी निक जोनास हे कायमच चर्चेचा विषय असतात. एकमेकांवर असणारे प्रेम व्यक्त करण्याची कुठलीही संधी हे दोघे सोडत नाहीत. हिंदूधर्मीयांमध्ये साजरा केला जाणार करवाचौथचा सण गुरुवारी पार पडला. प्रियंका चोप्रा हिनेही मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरा केला. 

यावेळी निक जोनासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये दोघांचा फोटो असून त्यासोबत निकने भावूक असा संदेश लिहला आहे. माझी पत्नी भारतीय आहे. ती हिंदू आहे आणि प्रत्येक गोष्टीत खूपच असाधारण आहे. आजपर्यंत तिचा धर्म आणि संस्कृतीविषयी तिने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. मला तिच्याविषयी आदर असून मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही नेहमीच आयुष्याचा असा आनंद घेत राहू. सर्वांना करवाचौथच्या शुभेच्छा, असे निकने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अनुष्कासाठी विराटनेही केला करवा चौथचा उपवास

निक आणि प्रियंका यांनी डिसेंबर २०१८ मध्ये उदयपूर पॅलेसमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. यानंतर प्रियंका निकसोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे. सोशल मीडियावर हे कपल कायमच चर्चेचा विषय असते. प्रियंका चोप्रा हिची भूमिका असलेला 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. निक जोनास यानेही या चित्रपटातील प्रियंकाच्या भूमिकेचे कौतुक केले.