Priyanka Chopra चा 'तो' फोटो व्हायरल, Oops Moment ची शिकार

प्रियंकाच्या सोशल मीडियावर चर्चा 

Updated: Nov 27, 2021, 11:29 AM IST
Priyanka Chopra चा 'तो' फोटो व्हायरल, Oops Moment ची शिकार

मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या लूकमध्ये प्रयोग करताना दिसते. मात्र या प्रयोगामुळे कधी-कधी ती ट्रोलिंगची शिकारही होते. एकदा असाच प्रकार घडला होता जेव्हा ती वेगळा ड्रेस घालून पार्टीला पोहोचली होती. या ड्रेसमध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती.

या ड्रेसमुळे झाली ट्रोल 

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडत आहे. 

सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रियंका चोप्राचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोक प्रियांका चोप्राला ट्रोल करत आहेत. प्रियांका चोप्राचा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल होतोय प्रियंकाचा फोटो 

वास्तविक, प्रियांका चोप्राचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका अवॉर्ड फंक्शनला पोहोचताना दिसत आहे. प्रियांकाने ब्लॅक बॉडीकॉन स्टाइलचा ड्रेस घातला आहे.  ज्यामध्ये एका बाजूने खूप मोठा कट आहेत. तसेच शिमरी जाळी बसवली आहे. 

प्रियांकाचा हा पोशाख खूपच चर्चेत आहे. जो पाहिल्यानंतर तुमचे डोळे पाणावतील. या फोटोमध्ये तिच्यासोबत घडलेल्या वॉर्डरोब मालफंक्शनमुळे प्रियंका Oops क्षणाची बळी ठरली. या फोटोत ती कसातरी आपला ड्रेस वाचवताना दिसत आहे. 

प्रियंकाचा आत्मविश्वास 

प्रियंका चोप्राने तिचा बोल्ड ड्रेस मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी केला होता. पापाराझींसमोर तिने स्टायलिश पोझही दिल्या. त्याने उघड झालेला भाग हाताने लपविण्याचाही प्रयत्न केला, मात्र असे करताना तिचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. प्रियांकासोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेकदा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. तिच्या सुपर बोल्ड आउटफिटमुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. प्रियांका चोप्रा तिच्या खास स्टाइलसाठी ओळखली जाते.

प्रियंकाचा लवकरच आगामी सिनेमा 

'सिटाडेल' आणि 'मॅट्रिक्स 4' व्यतिरिक्त, प्रियांकाचे अनेक हॉलीवूड प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.