close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियांका चोप्रा 'आरएसएस'च्या वाटेवर? नेटकऱ्यांकडून ट्रोल

प्रियांकाच्या लूकमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल

Updated: Jun 19, 2019, 05:53 PM IST
प्रियांका चोप्रा 'आरएसएस'च्या वाटेवर? नेटकऱ्यांकडून ट्रोल

नवी दिल्ली : बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. नुकतीच प्रियांका भारतातून न्यूयॉर्कमध्ये पोहचली आहे. प्रियांका आणि निक जोनासचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामुळे प्रियांकाला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. प्रियांकाला नेटकऱ्यांनी 'आरएसएसमध्ये (RSS) सामिल झाली का?' असा सवाल करत ट्रोल केलं आहे.

सध्या प्रियांका तिने घातलेल्या कपड्यांमुळे ट्रोल होत आहे. प्रियांकाने काळ्या रंगाचं टॉप, त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट आणि खाकी रंगाची शॉर्ट्स घातली आहे. तिचा हा लूक व्हायरल झाला आहे. या लूकवरुन नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या त्या फोटोवर अनेक मीम्स व्हायरल केल्या आहेत. काही लोक तिला आरएसएसची कार्यकर्ती तर काही नेटकरी प्रियांकाला आरएसएसची ब्रँड अॅम्बेसेडेर म्हणत आहेत. 

प्रियांका तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर आणि प्रियांका ही जोडी 'दिल धडकने दो' या चित्रपटानंतर आता पुन्हा 'द स्काय इज पिंक'मधून एकत्र येणार आहे. चित्रपटात जायरा वसीम प्रियांकाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.