'या' सुंदर ठिकाणी होणार प्रियंका आणि निकचं लग्न

कुठे करणार हे लग्न?

'या' सुंदर ठिकाणी होणार प्रियंका आणि निकचं लग्न

मुंबई : प्रियंका चोप्राने परदेशी मुलाची जीवनसाथी म्हणून निवड केली. त्यानंतर अमेरिकेत गुपचूप साखरपुडा केला. त्यानंतर भारतात निकसोबत तिने रोका केलं आहे. आता प्रियंकाचे चाहते आता तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. प्रियंकाचं लग्न कधी, कुठे आणि केव्हा होणार याबाबत चर्चा सुरू आहे. ज्यावर आता प्रियंकाने मोठा खुलासा केला आहे. तसेच आता लग्नाचा प्लान देखील सांगितला आहे. 

बॉलिवूडलाइफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका कुठे लग्न करणार आहे याची माहिती मिळाली आहे. प्रियंका आणि निकने 'हवाई' मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नाला प्रियंका आणि निक खाजगी ठेवण्याचा विचार करत आहेत. हे लग्न त्यांना चाहते आणि मीडियापासून दूर ठेवायचं आहे. हे आयलँड निकसाठी स्पेशल आहे. निकने या ठिकाणी Fie o आणि Jumanji सिनेमाचं शुटिंग देखील केलं आहे. तसेच निकला समुद्र देखील पसंद आहे. त्यामुळे निक आणि प्रियंकासाठी हवाई ही जागा अगदी खास आहे. 

 

" Both of them have work commitments right now which they need to finish. They will take some time to decide where they want it and when they want it,” - Madhu Chopra on PC & Nick's marriage  @priyankachopra @nickjonas @madhumalati

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

प्रियंकाच्या लग्नाबाबत प्रियंकाच्या आईने देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी माझे विचार कधीच प्रियंकावर लादले नाहीत. मात्र मला पारंपरिक लग्न करण्याची इच्छा आहे. पूजा आणि रोकेसोबत हे सगळं सुरू झालं आहे. माझ्यासाठी या सगळ्या परंपरा खूप महत्वाच्या आहेत. प्रियंकाच्या आईच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, त्यांना अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं आहे. प्रियंका तर हवाई या मोठ्या शहरात लग्न करणार आहे. हे लग्न अतिशय रॉयल असणार आहे. बहुदा हे लग्न ऑक्टोबरमध्ये होऊ शकतं. अजून तारीख निश्चित झालेली नाही.