'प्रोड्युसरनं घरी बोलावलं अन् माझं पोट...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 26, 2022, 12:09 PM IST
'प्रोड्युसरनं घरी बोलावलं अन् माझं पोट...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : 'दिया और बाती हम' अभिनेत्री कनिष्का सोनीनं 16 ऑगस्ट रोजी एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिनं स्वतः शीच लग्न केल्याची बातमी तिनं शेअर केली. त्यानंतर कनिष्का सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट करून तिने सर्वांना चकित केलं. आता कनिष्कानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अब्युसिव्ह रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. यासोबतच कनिष्कानं कास्टिंग काउचला समोर गेल्याचं सांगत तिचा वाईट अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला. कनिष्कानं केलेले हे खुलासे केल्यानंतर तिनं स्वतःशीच लग्न करण्याचं कारण समोर आलं आहे.

आणखी वाचा : अभिनेत्याला 6 महिन्यांसाठी Sex न करण्याचा सल्ला, पण नेमकं कारण काय़? चर्चांना उधाण

एका मुलाखतीदरम्यान, आपल्याला प्रेमाच्या बाबतीत नशिबाची साथ कमीच मिळाली असं तिनं स्पष्ट केलं. 'मी मुंबईत आले, तेव्हा बऱ्याच मुलांनी मला प्रपोज केलं. आतापर्यंत मी एक 1200- 1300 प्रपोजल नाकारले आहेत. एका लोकप्रिय अभिनेत्यानंही मला प्रपोज केलं होतं, लग्नासाठी. पण, फार कमी काळातच त्याचा खरा चेहरा समोर आला, तो अतिशय हिंसक होता', असं ती म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपला प्रियकर अतिशय रागीट स्वभावाचा होता असं सांगत दर पंधरा मिनिटांनी त्याला राग यायचा, तो हात उगारायचा असं तिनं सांगितलं. राग आल्यानंतर वस्तूंची तोडफोड आणि प्रियकराकडून कनिष्काला सततची होणारी मारहाण ही परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नव्हती. 

आयुष्यात एकाच व्यक्तीला जोडीदार म्हणून साथ द्याची असं कनिष्का म्हणायची खरी. पण, या नात्यात ती चुकली होती. त्याची ही विकृत वृत्ती तिला असद्य वेदना देत होती. अडीच वर्षांपर्यंत हे असंच सुरु होतं. या आघातातून सावरण्यासाठी तिला पाच वर्षांचा काळ गेला होता. 

KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला

तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत कनिष्का पुढे म्हणाली,'2008 मध्ये एका ए ग्रेड चित्रपटासाठी निर्मात्यानं मला त्याच्या घरी येण्यास सांगितले. जेणेकरून त्याला माझे पोट बघेल.' पुढे निर्मात्याविषयी बोलताना कनिष्का म्हणाली की 'हे ऐकल्यानंतर ती आश्चर्यचकीत झाली होती. ती निर्मात्यांना म्हणाली की चित्रपटासाठी ती असं काही करणार नाही. पण तो निर्माता तिला म्हणाला की, जर तू हे करणार नाही तर चित्रपटात कसं करणार? तेव्हा पोट दाखवण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 

आणखी वाचा : दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का

पुढे Babubhai Dibha यांचे आभार मानत कनिष्का म्हणाली, 'मी काही छोटे चित्रपट केले पण माझं स्वप्न प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौत बनण्याचे होते.' एवढंच नाही तर कनिष्काचा दावा आहे की, तिनं अक्षय कुमारच्या हाऊसफुल चित्रपटातील आयटम साँग नाकारले होते. तमिळ संगीत दिग्दर्शक श्रीकांत देवासाठी तिनं एक आयटम साँग केलं. विशेष म्हणजे कनिष्क सध्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. तिनं स्वतः शी लग्न केलं आहे. कनिष्का आजकाल सिंदूर-मंगळसूत्रातील तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसते. 

कनिष्कानं 'दीया और बाती हम' शिवाय 'पवित्र रिश्ता', ' देवों के देव महादेव', 'महाबली हनुमान' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.