'पुष्पा' Allu Arjun प्रमाणे त्याची पत्नीही 'फायर', गोव्यातील बेडरुम व्हिडिओ व्हायरल

मात्र त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी अजूनही गोव्याच्या प्रेमात दिसत आहे.

Updated: Jan 23, 2022, 01:54 PM IST
 'पुष्पा' Allu Arjun प्रमाणे त्याची पत्नीही 'फायर', गोव्यातील बेडरुम व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांचा पुष्पा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे डायलॉग आणि गाणी तुफान व्हायरल होत आहेत.

या सिनेमातील 'पुष्पा... फूल नहीं, फायर हूं मैं, झुकूंगा नहीं'..  हा संवाद सगळीकडे आगीसारखा पसरला आहे. फेसबुक असो की इंस्टाग्राम, सर्वत्र यूजर्स या डायलॉगचे आणि 'पुष्पा' अल्लू अर्जुनचे वेड लागले आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आणि लोकांची मने जिंकली. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनचे सतत कौतुक होत आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात तो कुटुंबासह गोव्यातील सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.

अल्लू अर्जुन आणि त्याचे कुटुंब काही दिवसांपूर्वी गोव्याहून परतले आहे. मात्र त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी अजूनही गोव्याच्या प्रेमात दिसत आहे, ती सतत व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

 अलीकडेच स्नेहा रेड्डीने गोवा व्हॅकेशनमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये गोव्याच्या सुट्टीची झलक दिसत आहे. ज्यामध्ये स्नेहा पती अल्लू आणि मित्रांसोबत पोज देताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने हॉटेलच्या बेडरुममध्ये आराम करतानाचे , बीचवर एन्जॉय करतानाचे  व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. 

अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याची पत्नी स्नेहा रेड्डी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.