शाल विकणारा राज कुंद्रा कसा झाला 4 हजार कोटींचा मालक?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा एक मोठा बिझनेसमॅन आहे.

Updated: Jul 20, 2021, 03:31 PM IST
शाल विकणारा राज कुंद्रा कसा झाला 4 हजार कोटींचा मालक? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा एक मोठा बिझनेसमॅन आहे. राज कुंद्रा याच्याकडे करोडो रूपयांची संपत्ती आहे. दरम्यान सोमवारी मुंबई क्राईम ब्रांचने राज कुंद्रा याला अटक केली. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लिल फिल्म निर्मिती प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

राज कुंद्रा एक ब्रिटीश-भारतीय बिझनेसमॅन आहे. राज कुंद्राला अनेक प्रकारच्या व्यापारासह क्रिेकेट तसंच मिक्स मार्टियल आर्टची देखील आवड आहे. यामुले त्याने क्रिकेट आणि मार्टियल आर्टमध्ये गुंतवणूकही केली होती. 

राज कुंद्राचं एकूण नेटवर्थ 550 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4 हजार करोड रूपये इतकी आहे. 2004 साली कुंद्राचं नाव ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 198वं होतं. मिक्स मार्टियल आर्टव्यतिरिक्त कुंद्रा बऱ्याच कंपन्यांचा मालक आहे. यामध्ये ग्रुपको डेव्हलपर्स, टीएमटी ग्लोबल, विवान इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश आहे. 

शिल्पा शेट्टीपेक्षा 10 पटीने जास्त आहे राजची कमाई

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं 2009 मध्ये लग्न झालं होतं. दरम्यान राज कुंद्राची शिल्पापेक्षा 10 पटीने अधिक कमाई असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी दरवर्षी 10-12 करोड रूपये कमवते. तर राजची कमाई 10 पटीने जास्त असून 100 कोटींपेक्षा जास्त आहे. शिल्पाची नेटवर्थ 150 करोड रूपये आहे.

राज कुंद्राला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.  फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रँचनं अश्लील चित्रपट बनवणा-यांवर तसंच विशिष्ट ऍप्लिकेशनवर ते अपलोड करणा-यांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हा प्रमुख आरोपी असल्याची बाब तपासात समोर आली. त्यानुसार सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुंद्राला पोलिसांनी अटक केली.