अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरचा बंगला आणि शिल्पा म्हणाली हाच नवरा म्हणून चांगला

पॉर्न फिल्म प्रकरणातील राज कुंद्राचे त्रास कमी होण्याचं नावच घेत नाही.

Updated: Jul 27, 2021, 10:41 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरचा बंगला आणि शिल्पा म्हणाली हाच नवरा म्हणून चांगला

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणातील राज कुंद्राचे त्रास काही कमी होण्याचं नावच घेत नाहीत. त्याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत राज शिल्पा शेट्टीसोबत त्याच्या लव्हस्टोरीविषयी काही गोष्टी शेअर करत आहे. या मुलाखतीत राजने सांगितलं होतं की, शिल्पा आणि त्याची पहिली भेट त्याच्या मॅनेजरमार्फत झाली होती. त्यावेळी शिल्पा यूके रिएलिटी शोची विनर ठरली होती आणि तिची लोकप्रियता खूप जास्त होती.

राज शिल्पाकडे परफ्यूम बनवण्याच्या आयडिया घेवून गेला आणि इथेच त्याने शिल्पाचं हृदय जिंकलं. जेव्हा तो पहिल्याच भेटीत तिच्या आईच्या पाया पडला होता. . या एका मुलाखतीत राजने सांगितलं होतं की, शिल्पाला त्याच्याबरोबरच्या प्रेमसंबंधात काडीचाही रस नव्हता. राज पुढे म्हणाला, ''मी असं बिलकुल म्हणणार नाही की, तीच माझ्या मागे लागली होती की, मला लग्न करायचं आहे.  मी असं म्हणणं चुकीचं ठरेल. 

जेव्हा मला शिल्पा माझ्या प्रेमात पडेल अशी थोडीशी आशा दिसली तेव्हा मी माझे हात धुवून घेतले आणि मग शिल्पाच्या मागे पडलो मला वाटलं की चला प्रयत्न करूया. पण शिल्पा स्पष्टपणे म्हणाली, राज, असं होणार नाही, मी तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही. ती खूप स्ट्रिक्ट होती. मी तिला विचारलं की, असं का होणार नाही? तर ती म्हणाली, मी मुंबई सोडू शकत नाही, मी भारत सोडू शकत नाही आणि तू लंडनमध्ये राहतोस.

यानंतर मी निर्माता वशु भगनानी यांना फोन केला आणि सांगितलं की मला मुंबईत प्रॉपर्टी हवी आहे. त्यांनी मला सांगितलं की जुहू येथे एक प्रॉपर्टी आहे, मी ती प्रॉपर्टी पाहिल्याशिवाय खरेदी केली आणि १० मिनिटांनी शिल्पाला फोन करून म्हणालो, तुम्ही म्हणत होता की, तुम्ही मुंबई सोडून कुठेच जाणार नाही, मग तुम्हाला  बच्चन सरांच घर माहित असेलच. मी त्यांच्या घराच्या समोर एक घर विकत घेतलं आहे, आता बोला''. राज यांच्या या चर्चेने शिल्पाचे हृदय वितळलं आणि तिने तिच्या लग्नाला होकार दिला. यानंतर या दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना दोन मुले आहेत.