जेव्हा रजनीकांत आपला जिगरी मित्र अमिताभ बच्चन यांना घाबरले होते, जाणून घ्या संपूर्ण रंजक किस्सा

रजनीकांत ५ दशके सिनेमा विश्वात राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत. 

Updated: May 24, 2021, 04:05 PM IST
जेव्हा रजनीकांत आपला जिगरी मित्र अमिताभ बच्चन यांना घाबरले होते, जाणून घ्या संपूर्ण रंजक किस्सा

मुंबई : दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत 71 वर्षांचे आहेत. रजनीकांत ५ दशके सिनेमा विश्वात राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत.  अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत ज्याची तुम्हाला माहिती नसेल. ही कहाणी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्याशी संबंधित आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे खूप चांगले मित्र आहेत पण तुम्हाला माहिती आहे काय की, एकदा रजनीकांत अमिताभ बच्चन यांनी घाबरले होते?

'द रोबोट' चित्रपटामधील बिग बीची सून ऐश्वर्या राय बच्चन रजनीकांत यांच्या अपोजिट होती. या सिनेमात रजनीकांत आणि ऐश्वर्या यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.  पण ऐश्वर्या त्यांचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन यांची सून असल्याने ति्च्यासोबत रोमँटिक सीन्स करायला ते अस्वस्थ असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. ते म्हणाले की, बच्चन यांच्या सुनेसोबत एका चित्रपटात रोमान्स करताना ते खूप घाबरले होते आणि या भीतीचं कारण होतं त्यांचे मित्र अमिताभ बच्चन.

रजनीकांत म्हणाले की, 'या चित्रपटातील लव्ह सीन करताना मला अस्वस्थ वाटत नव्हतं, कारण मी जन्मजात कलाकार आहे पण मला भीती वाटत होती की, अमिताभ बच्चन जी म्हणतील की' खबरदार रजनी'. रजनीकांत यांनी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचं कौतुक केलं होतं. त्यांनी सांगितलं की, ऐश्वर्या स्वत:ला खूप चांगलं कॅरी करत असून मेकअपशिवायसुद्धा ती खूप सुंदर दिसते.

रजनीकांत यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्व रागनगाल' या चित्रपटाने केली होती. त्यांच्यासोबत कमल हसन आणि श्रीविद्या सारख्या मोठ्या स्टार्सनीही या चित्रपटात काम केलं होतं. रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच नकारात्मक भूमिका साकरल्या.

रजनीकांत यांनी 'भुवन ओरु केल्विकुरी' चित्रपटात प्रथम होरोची भूमिका साकारली होती. त्यांचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि यामुळे रजनीकांत लोकांच्या नजरेत स्टार झाले. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट 'अंधा कानून' होता. आज त्यांना दक्षिण भारतीय सिनेमातील सर्वात मोठं स्टार मानलं जातं.