VIDEO: सुपरस्टार रजनीकांत आहेत का हे? 'अशा' अवतारात पाहून चाहते गोंधळात

Rajnikant Look Alike Video:  रजनीकांत यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता रजनीकांत यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे परंतु घाबरू नका हे रजनीकांत नाहीत. कारण त्यांचा अवतार पाहून तुम्हीही काहीसे कन्फ्यूज व्हाल. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 21, 2023, 06:44 PM IST
VIDEO: सुपरस्टार रजनीकांत आहेत का हे? 'अशा' अवतारात पाहून चाहते गोंधळात title=
rajnikant look alike video goes viral on instagram

Rajnikant Look Alike Video: रजनीकांत यांचे अनेक फॅन्स आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. गेल्या अनेक दशकांपासून त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आज रजनीकांत हे सुपरस्टार आहेत आणि त्यांच्याकडे करोडोंची मालमत्ता आहे. परंतु सध्या तुम्हला रजनीकांत हे रस्त्यावर शॉर्ट्स घालून उभे राहिलेले दिसतील. त्यातून त्यांनी यावेळी खाकी टाईप शर्टही घातला आहे आणि त्यांचा अवतार हा काहीसा वेगळा आणि विचित्रही दिसू शकतो. यावरून तुम्हाला असाही प्रश्न पडेल की नक्की रजनीकांत हे अशाप्रकारे वेगळे का वाटत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यामागील कारण आहे तरी काय? रजनीकांत यांचे अनेक डुप्लिकेट्सही आहेत. जे सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. तेव्हा आम्ही जे तुम्हाला वर सांगितलं ते काही खरं नाहीये. हो हे शॉर्ट्स आणि पॅण्ट घातलेले रजनीकांत नसून हे त्यांच्यासारखेच दिसणारे एक इसम आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. 

त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या हे रजनीकांतसारखे दिसत आहेत. म्हणून चाहत्यांचा चांगला घोळ झाला आहे. रजनीकांत यांच्या या व्हायरल व्हिडीओची बरीच चर्चा आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात काही ना काही हे व्हायरल होतच असतं. त्यातून असे अनेक इंटरेस्टिंग व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. असं म्हणतात की या जगात एका माणसासारखेच दिसणारी सात माणसं असतात. हीच माणसं कधी कोणत्या रूपात आपल्याला भेटीत याचा काहीच थांगपत्ता नाही. सध्या रजनीकांत यांच्याबाबतीतही असंच काहीसं झालं आहे. 

हेही वाचा : फारसे न चालेले पण चर्चेत राहिलेले सुपरस्टार्सचे चित्रपट पाहा OTT वर! वाचा संपूर्ण यादी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या या माणसाचा चेहराही फारच रजनीकांत यांच्याशी मिळता जुळता आहे. त्यामुळे त्यांची सॉलिड चर्चा रंगलेली आहे. पायात चप्पल, शॉर्ट्स आणि शर्ट असा हा अवतार पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. त्यांचा हा व्हिडीओ ट्विटवर व्हायरल झाला आहे. 

तुम्ही पाहिलंत तर या माणसाचे हास्यही रजनीकांत यांच्यासारखेच आहे. अगदी हास्य काय चेहराही त्यांच्यासारखाच वाटतो आहे. हेअरस्टाईलही तशीच आहे. त्यामुळे जर का तुम्ही असा विश्वास ठेवलात की ही व्यक्ती रजनीकांतच आहे तर तुम्हाला आश्चर्यही वाटेल की 100 कोटी कमावणारे रजनीकांत यांना नक्की झालंय काय? परंतु सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओतून असे दिसते की या व्हिडीओत दिसणारी ही व्यक्ती चेन्नई येथे चहा विकते.