राणादाची सापडलेली वही सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच फूलत आहे. आता खऱ्या अर्थाने दोघांचे मनोमिलन झालेय. दोघेही एकमेकांची मस्करी करताना काळजी घेत आहेत. त्यांच्यातील रोमान्सही बहरत आहे. अशिक्षित राणा आता शिक्षणाचे धडे घेत आहे. त्याची एक वही सापडली. हीच वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2017, 03:27 PM IST
राणादाची सापडलेली वही सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच फूलत आहे. आता खऱ्या अर्थाने दोघांचे मनोमिलन झालेय. दोघेही एकमेकांची मस्करी करताना काळजी घेत आहेत. त्यांच्यातील रोमान्सही बहरत आहे. अशिक्षित राणा आता शिक्षणाचे धडे घेत आहे. त्याची एक वही सापडली. हीच वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दिवसागणिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या मालिकेला टीआरपीही चांगला मिळत आहे. टीआरपीमध्ये सध्या राणादा-अंजली ही जोडी अव्वल स्थानावर आहे.

कोल्हापूर येथे या मालिकेचे चित्रीकण सुरु आहे. खास कोल्हापूर टच असलेल्या या मालिकेला चांगला प्रेक्षक वर्ग मिळालाय. राणाने सध्या शिक्षणाचे मनावर घेतले आहे. राणाने शिक्षण घेऊ नये म्हणून त्याची वहिनी नंदीता काहीना काही कारणं शोधत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या या अडथळ्यांना यश येणार असे वाटत असताना अंजलीबाई शिक्षणाचे महत्व पटवून सांगून राणाचे मन वळतात. आता राणाला शिक्षणाचे महत्व पटल्याने तो शिकत आहे. अक्षर काढण्यात दंग झालाय. तो घरात तसेच शाळेत हे धडे घेत नाही तर चक्क शेतावरच घेत आहे. त्याची हीच वही सापडली आणि ही वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.