'या' व्यक्तीने केला श्रीदेवीचा अखेरचा मेकअप

श्रीदेवीचं असं अकाली जाणं प्रत्येकालाच चटका लावून जाणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 4, 2018, 12:58 PM IST
'या' व्यक्तीने केला श्रीदेवीचा अखेरचा मेकअप

मुंबई : श्रीदेवीचं असं अकाली जाणं प्रत्येकालाच चटका लावून जाणार आहे. 

उत्तम अभिनय करणारी श्रीदेवी एक आई आणि पत्नी म्हणून देखील किती परिपूर्ण होती हे आपण पाहिलंच. श्रीदेवीच्या अंत्ययात्रेचा तिचा तो चेहरा कुणीही विसरू शकत नाही. लाल रंगाच्या कांजीवरम शालू आणि तिचं ते सौंदर्य प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारं होतं. 

कपाळावर बिंदी आणि गळय़ात अहेवलेण असे श्रीदेवीचे अंत्यदर्शन झाले आणि प्रत्येकाच्याच डोळय़ांत पाणी आले. श्रीदेवीचा हा अखेरचा मेकअप कुणी केलं. कोण आहे ती व्यक्ती ज्याने श्रीदेवीच्या अखेरच्या क्षणी देखील तिचं सौंदर्य जपली. आणि चाहत्यांसमोर - कुटुंबियांसमोर तीच सुंदर, लाघवी श्रीदेवी आणली. 

कोण आहे ती व्यक्ती?

अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या मदतीने रंगभूषाकार राजेश पाटील यांनी केला होता अशी माहिती मिळाली आहे. राजेश पाटील हे श्रीदेवी यांचे आवडते रंगभूषाकार होते. त्यांनीच श्रीदेवीच्या चेहऱ्यावरील अखेरचा मेकअप करावा असे हेअर स्टायलिस्ट नूरजहाँ अन्सारी यांनी सुचविले. त्यानंतर अनिल कपूर यांची पत्नी सुनीता आणि राणी मुखर्जी या दोघींनी श्रीदेवीच्या पार्थिवावर लाल रंगाची साडी पांघरली आणि मग पाटील यांनी हलकासा मेकअप केला. 'मॉम' चित्रपटात पाटील यांनीच तिचा मेकअप केला होता.

जान्हवी कपूरने व्यक्त केल्या भावना 

सीने में एक अजीब सा खालीपन है। मेरे सीने में एक अजीब सा खालीपन है और मुझे पता है की मुझे उसके साथ जीना सीखना होगा। तुझ्या प्रेमाची जाणीव मला होत आहे. मला जाणीव होते की तू मला दुःख आणि वेदनांपासून दूर नेत आहे.  मी जेव्हा डोळे बंद करते तेव्हा मला चांगल्या गोष्टी दिसतात. मला माहीत आहे की हे सगळे तूच करत आहेस अशा अश्रूंनी भिजलेल्या शब्दांत श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीने तिच्या आईला पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. येत्या ७ मार्चला जान्हवीचा वाढदिवस आहे. आणि पहिल्यांदा जान्हवी आपल्या आईशिवाय हा वाढदिवस साजरा करणार आहे.