राणी मुखर्जीवर का आली 23 वर्ष जुना ड्रेस घालण्याची वेळ?

राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या 'बंटी और बबली 2' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे.

Updated: Oct 28, 2021, 03:42 PM IST
राणी मुखर्जीवर का आली 23 वर्ष जुना ड्रेस घालण्याची वेळ?

मुंबई : राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या 'बंटी और बबली 2' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'टॅटू वालीये' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात राणी आणि सैफसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसत आहेत. नाव ऐकून तुम्हाला वाटले असेल की 'टॅटू वालीये' हे गाणे पूर्णपणे वेगळे आणि एनर्जीने भरलेले पंजाबी गाणे असेल,पण तसे नाही.

चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज

'टॅटू वालीये' या गाण्यात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ हटके ड्रेसिंगमध्ये नाचताना दिसत आहेत.बॉलीवूडमध्ये बनवलेल्या इतर पंजाबी गाण्यांप्रमाणेच हे गाणं आहे.

राणीने 23 वर्षांनंतर हाच ड्रेस घातला 

एक गोष्ट खरोखरच मनोरंजक आहे ती म्हणजे राणी मुखर्जीचा पोशाख. 'टॅटू वालीये' या गाण्यासाठी राणीने सिल्व्हर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

23 वर्षांपूर्वी राणीने 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'कोई मिल गया' गाण्यासाठी असाच छोटा ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी राणी गिटार वाजवत स्टेजवर आली. यावेळी ती आपल्या स्टाईलने आपल्या जुन्या सिनेमातील लूकची आठवण करुन देत आहे.