...म्हणून रानी मुखर्जी रोज तिच्या पतीवर रागवते!

 अभिनेत्री रानी मुखर्जी सध्या तिच्या आमागी चित्रपटाच्या हिचकीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 19, 2018, 10:39 AM IST
...म्हणून रानी मुखर्जी रोज तिच्या पतीवर रागवते!

मुंबई : अभिनेत्री रानी मुखर्जी सध्या तिच्या आमागी चित्रपटाच्या हिचकीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेगन्सीच्या ब्रेकवर गेलेली रानी पुन्हा एकदा या चित्रपटातून कॅमबॅक करत आहे. याचदरम्यान ती नेहा धुपियाचा चॅट शो 'वोग बीएफएफ' मध्ये गेली. या चॅट शो मध्ये रानीने अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. इतकंच नाही तर आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी उलघडल्या. 

नेहाचा प्रश्न अन् रानीचे उत्तर

तु कधी तुझ्या नवऱ्यावर रागवतेस का? असे नेहाने विचारताच रानी म्हणाली की, मी दरदिवशी माझ्या नवऱ्यावर रागवते. पण ते असे काही करतात की माझा राग दूर पळून जातो. आम्ही दोघेही एकमेंकांवर नाराज होतो. रागवतो. प्रेमाने आमची नाराजी व्यक्त करतो. मला असे वाटते की, मी जर कोणावर रागवत असेन ना तर याचा अर्थ मी त्या व्यक्तीवर खऱ्या अर्थाने प्रेम करते.

ही आहे चित्रपटाची कथा

२०१४ मध्ये आलेल्या मर्दानी या चित्रपटात रानी शेवटची झळकली होती. त्यानंतर आता हिचकी या चित्रपटात ती शालेय शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. तिला सारखी उचकी येण्याचा त्रास असतो. त्यामुळे तिला कुठे नोकरी मिळत नसते. त्यानंतर अथक प्रयत्नांनी तिला एक नोकरी मिळते. मग तिचे मस्तीखोर विद्यार्थी प्रेमळ कसे होतात, यावरचा हा चित्रपट आहे.

२३ मार्चला होणार प्रदर्शित

रानी मुखर्जीचा हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता तारीख पुढे ढकलून ती २३ मार्च करण्यात आली आहे.