मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी अनेक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत राणी दिसली होती. पण आता राणी मुखर्जीचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच राणी मुखर्जी पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राणी अचानक बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
आज राणी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर दिसली. राणी मुखर्जी हिरव्या रंगाच्या सूट आणि गुलाबी ओढणीत सुंदर दिसत होती. आता राणीची फिगर पाहून सगळेच तिच्या बेबी बंप आणि प्रेग्नेंसीची चर्चा करत आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त आणि फक्त राणी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सध्या राणीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसी चर्चा रंगत आहे. पण याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राणीला एक मुलगी आहे. 9 डिसेंबर 2015 मध्ये आदित्य-राणीला 'अदिरा' मुलगी झाली.
राणीने 21 एप्रिल 2014 साली पॅरिसमध्ये निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत गुपचुप लग्न केलं. आदित्य चोप्राने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यादरम्यान राणी आणि आदित्य यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती.
यामुळे प्रेम चोप्रा नाखूश होते. यामुळे नाराज होऊन आदित्य चोप्रा घर सोडून हॉटेलमध्ये राहू लागले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर आदित्य आणि राणी यांचं लग्न झालं.