दीपिकाच्या अगोदर या अभिनेत्रींना डेट करत होता रणवीर

कोण आहेत या अभिनेत्री 

दीपिकाच्या अगोदर या अभिनेत्रींना डेट करत होता रणवीर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह अफेअरनंतर आता दीपिका पदुकोणसोबत लग्न करत आहे. 33 वर्षांच्या रणवीर सिंहचं अफेअर दीपिकाच्या अगोदर या अभिनेत्रींसोबत होतं. दीपिका आणि रणवीर 14 - 15 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकत आहे. दीप - वीरचं लग्न नेमकं कुठे होणार यामध्ये चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. पण असं असलं तरीही दीप-वीर ही बॉलिवूडमधील बाजीराव - मस्तानीप्रमाणे लोकप्रिय जोडी आहे. 

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 2013 मध्ये रासलीला या सिनेमात पहिले दिसले. या सिनेमानंतरच ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली. यानंतर 2014 मध्ये फायंडिंग फॅनी, 2015 मध्ये बाजीराव मस्तानी या सिनेमात दिसले आहेत. 

आणि हाच तो काळ होता जेव्हा हे दोघं एकत्र आले होते. त्यानंतर 2018 मध्ये हे संजय लीला भन्साळीच्या पद्मावतमध्ये एकत्र दिसले. या सिनेमानंतरच दोघांच्या लग्नाची बातमी समोर येऊ लागली आहे. 

दीपिकाच्या अगोदर रणवीर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना डेट करून झाला आहे. एवढंच काय तर रणवीरचं नाव अनुष्कासोबत देखील जोडलं गेलं होतं. 'बँड बाजा बारात' या सिनेमातून रणवीरने डेब्यू केला असून त्याने अनुष्कासोबत स्क्रिन शेअर केली आहे. यानंतरच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. मग दोघांनी 'लेडीज वर्सेस रिकी बहल'मध्ये काम केलं आणि ब्रेकअपनंतर 'दिल धडकने दो' मध्ये काम केलं आहे. 

रणवीरचं नाव परिणीती चोप्रासोबत देखील घेतलं जात असे. दोघांनी पहिल्यांदा 'लेडीज वर्सेस रिकी बहल'मध्ये एकत्र काम केलं आहे. तसेच 2013 मध्ये 'किल दिल'नंतर त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली. 

2013 मध्ये 'लुटेरे' दरम्यान सोनाक्षी सिन्हासोबत रणवीरची जवळीक वाढली. मीडियात खूप चर्चा रंगल्या पण रणवीरने त्याचं खंडन केलं. 

सर्वात पहिलं रणवीरचं नाव हेमा मालिनी - धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओलसोबत जोडलं गेलं. असं म्हटलं जातं की, अहानाने रणवीरला डीच केलं. रणवीर अगदी कॉलेजच्या दिवसांपासून अहानाच्या प्रेमात वेडा होता. पण अहाना विद्या बालनच्या दिराच्या प्रेमात पडली आणि रणवीरपासून वेगळी झाली. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x