मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या पद्मावतच्या प्रदर्शनानंतर रसिक प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी रणवीर सिंगच्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेला सर्वांनीच मनापासून दाद दिली. याबरोबरच भारतातील चित्रपटांच्या कमाईत २०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा रणवीर सिंग हा सर्वात तरुण अभिनेता ठरला आहे.
At 32, @RanveerOfficial becomes the youngest actor (M) to have an entry in the ₹ 200 Cr All-India Nett Club with #Padmaavat.. Congrats! pic.twitter.com/IboHnnm76i
— Ramesh Bala (@rameshlaus) February 6, 2018
पद्मावतने देशात तब्बल २१९ कोटींची कमाई केली. वयाच्या ३२ व्या वर्षी २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा रणवीर हा तरुण अभिनेता ठरला आहे. चित्रपट अभ्यासक रमेश बाला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अल्लाउद्दीन खिल्जी साकरण्यासाठी रणवीरने शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही खूप मेहनत घेतली आहे. मात्र त्याच्या कष्टांचे चीज झाले, असे म्हणायला काही हरकत नाही.
आतापर्यंत पीके, बाहुबली 2, सिक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान सुलतान, टायगर जिंदा है, धूम 3, चेन्नई एक्स्प्रेस, प्रेम रतन धन पायो, 3 इडियट्स या चित्रपटांचा २०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर खान मंडळींचे वर्चस्व असते. त्यानंतर अक्षय कुमार, प्रभास, हृतिक रोशन, सैफ अली खान, अजय देवगन यांसारख्या अभिनेत्यांचे चित्रपटही चांगली कामगिरी करतात. मात्र रणवीरने कमी वयात चांगलीच बाजी मारली.