VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर'

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर असून हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Mar 9, 2018, 03:28 PM IST
VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर' title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर असून हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. 

प्रियंका सध्या क्वांटिकोच्या तिसऱ्या सीरिजसाठी शूटिंग करतेय आणि यानंतर ती हॉलीवूडच्या आणखी दोन सिनेमांमध्ये दिसणार आहे. 

बॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे देणाऱ्या प्रियंका चोप्राला बॉलीवूडमध्ये सगळेच मिस करतायत. रणवीर सिंहही प्रियंकाला मिस करतोय तसेच तिच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.

काही वेळापूर्वी प्रियंकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात रणवीर प्रियंकाशी बोलतोय. तसेच बॉलीवूडमध्ये परत ये असंही सांगतोय.

रणवीरच्या या प्रश्नावर उत्तर देताना प्रियंका म्हणते, असं होणार आहे. प्रियंकाचे या उत्तरावरुन हे स्पष्ट झालंय की प्रियंका लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करतेय.