Rashmika Mandanna Accident : 'आयुष्य खूप छोटं आहे!' रश्मिका मंदानाचा अपघात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली अपडेट

Rashmika Mandanna Accident : अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत एक धक्कादाय बातमी समोर आलीय. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिलीय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 10, 2024, 10:56 AM IST
Rashmika Mandanna Accident : 'आयुष्य खूप छोटं आहे!' रश्मिका मंदानाचा अपघात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली अपडेट
rashmika mandanna Accident actress shares health update on instagram

Rashmika Mandanna Accident : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नॅशनल क्रश ओखळली जाणारी रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. दाक्षिणात्य चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो तिच्या अभिनयाचा जादूने चाहते घायाळ आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह दिसत नव्हती. त्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडला होता. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केलाय. तिने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अपघाताची माहिती दिलीय. त्यानंतर चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. (rashmika mandanna Accident actress shares health update on instagram)

Add Zee News as a Preferred Source

अभिनेत्रीने दिली हेल्थ अपडेट 

रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्टही लिहिलीय. अभिनेत्रीने लिहिलंय की, अरे मित्रांनो कसे आहात. मला माहित आहे की मी बऱ्याच  काळापासून सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर नव्हती. याला बराच काळ लोटला आहे.

पुढे, अभिनेत्रीने लिहिलंय की, गेल्या महिन्यात मी फार सक्रिय नव्हते, याचं कारण म्हणजे माझा एक छोटासा अपघात झाला होता, पण आता मी बरी आहे. हा एक छोटासा अपघात होता, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी आराम करत होते. मी आता बरा आहे आणि काही गोष्टी करण्यात अधिक सक्रिय झाली आहे. 

नेहमी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या, कारण आयुष्य खूप नाजूक आणि लहान आहे. आपल्याला उद्या मिळेल की नाही हे माहित नाही, म्हणून दररोज आनंद निवडा. अजून एक अपडेट मी खूप लाडू खात आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर एका यूजरने लिहिलंय की, तू आता बरी आहेस याचा मला आनंद आहे. दुसऱ्या युजरने लिहिलंय की, तुम्ही लवकर बरे व्हा. याशिवाय काही लोकांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
अभिनेत्री अलीकडेच संदीप रेड्डी वंगा स्टारर 'ॲनिमल' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरीसह अनेक स्टार्स दिसले होते. आता रश्मिका बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More