बिग बींच्या 'गुडबाय'चा फर्स्ट लूक व्हायरल, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसणार 'या' भूमिकेत

 नुकताच रश्मिकाच्या फॅन पेजवर बिग बी आणि रश्मिकाचा सेटवरील एक फोटो व्हायरल होतो आहे.

Updated: Jul 13, 2021, 03:40 PM IST
बिग बींच्या 'गुडबाय'चा फर्स्ट लूक व्हायरल, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसणार 'या' भूमिकेत  title=

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) साऊथ इंडस्ट्रीत तर चलती आहेच, पण आता बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी ती सज्ज  आहे. रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे, नॅशनल क्रश अशी तिची ओळख आहे. आता लवकरच बॉलिवूड सिनेमात ती दिसणार असल्याने फॅन्स देखील एक्साइटेड आहेत. हा तिचा दुसरा बॉलिवूड सिनेमा असणार आहे. 

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका स्क्रिन शेअर करणार आहे. बिग बीं आणि रश्मिका एकत्र दिसणार असल्याने चाहते देखील आगामी 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमासाठी भलतेच एक्साईटेड आहेत.

या सिनेमाचं शुटींग एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आलं होतं. नुकताच रश्मिकाच्या फॅन पेजवर बिग बी आणि रश्मिकाचा सेटवरील एक फोटो व्हायरल होतो आहे. 
बिग बींसोबत या सिनेमात नीना गुप्ता  (Neena Gupta) लीड रोलमध्ये दिसणार आहेत. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि रश्मिका  फोनमध्ये बघत आहेत.

या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर करड्या रंगाचे जॅकेट घातलं आहे.तर  रश्मिका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
रश्मिका, नीना गुप्ता आणि बिग बी यांच्या व्यतिरिक्त पवेल गुलाटी मुख्य भूमिका साकारणार आहेत. 

पावेल गुलाटी अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  विकास बहल या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.एकता कपूरची निर्मिती असलेल्या या  सिनेमाच्या रिलीजची फॅन्स वाट पाहत आहेत.  

 अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या सिनेमांची रांग लागली आहे.  रणबीर-आलियासोबत ब्रह्मास्त्र, त्यानंतर अजय देवगनसोबत मेडे तर इमरान हाश्मीसोबत चेहरे आणि  झुंड या आगामी सिनेमात ते दिसणार आहेत.