Shubhman Gill Crush on Rashmika: तू शुभमन गिलचा क्रश? प्रश्न ऐकताच रश्मिका मंधानाने अशी दिली प्रतिक्रिया

Rashmika Mandanna on Shubhman Gill: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) नुकतीच Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. रॅम्प वॉक करत रश्मिकाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान, यावेळी फोटोग्राफर्सनी रश्मिकाला शुभमन गिलचा (Shubhman Gill) उल्लेख न करता आता तू क्रिकेटर्सचाही क्रश होत आहेस असं सांगितलं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.   

Updated: Mar 12, 2023, 06:32 PM IST
Shubhman Gill Crush on Rashmika: तू शुभमन गिलचा क्रश? प्रश्न ऐकताच रश्मिका मंधानाने अशी दिली प्रतिक्रिया title=

Rashmika Mandanna on Shubhman Gill: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाला (Rashmika Mandanna) नॅशनल क्रश म्हणून ओळखलं जातं. दाक्षिणात्य अभिनेत्री असणारी रश्मिका 'पुष्पा' चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र सोशल मीडियासह सगळीकडे तिची चर्चा सुरु असते. नुकतीच ती Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला अप्रत्यक्षपणे भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसंबंधी (Shubhman Gill) विचारलं असता तिने त्यावर प्रतिक्रियाही दिली. 

शुभमन गिलने रश्मिका मंधाना आपली क्रश आहे असं सांगितल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. एक इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली असून, त्यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, शुभमनने 'मिशन मजनू'मधील अभिनेत्री आपली क्रश आहे असं सांगितलं आहे. दरम्यान शुभमनने आपण असं काही बोलल्याचं आठवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र फोटोग्राफर्सनी रश्मिका मंधानाला याबद्दल थेट विचारलं. 

ऱश्मिका मंधाना Lakme Fashion Week मध्ये रॅम्प वॉकसाठी पोहोचली होती. साडी आणि ब्लाऊजमध्ये रश्मिका मंधाना रॅम्प वॉकसाठी तयार करताना फोटोग्राफर्सनी तिला म्हटलं की, आता तू क्रिकेटर्सचाही क्रश होत आहे. त्यावर रश्मिकाने डोकं हलवत स्मितहास्य दिलं. 

शुभमन गिलचं रश्मिकावर क्रश?

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात उल्लेख आहे की "एका मुलाखतीत शुभमनला त्याला सर्वात जास्त कोणती अभिनेत्री आवडते असं विचारण्यात आलं. त्यावर शुभमनने हसत उत्तर देणं टाळण्याचा प्रयत्न केला. पण अजून विचारलं असता त्याने रश्मिका मंधानाचा नाव घेत तिच्यावर क्रश असल्याचं सांगितलं". यानंतर शुभमन गिल आणि रश्मिका मंधाना ट्रेंडिंगमध्ये आले होते. दरम्यान रश्मिकाने यावर सविस्तर भाष्य केलेलं नाही. ती काय बोलेल याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. 

दरम्यान शुभमनला यासंबंधी विचारण्यात आलं असता, हे कोणतं संभाषण आहे, मलाच याची कोणती कल्पना नाही असं उत्तर दिलं.