रेखाच्या या वाईट सवयीमुळे अमिताभ बच्चन चिडले, सेटवरच अभिनेत्रीला सुनावत म्हणाले...

आता आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Updated: Jan 19, 2022, 05:43 PM IST
रेखाच्या या वाईट सवयीमुळे अमिताभ बच्चन चिडले, सेटवरच अभिनेत्रीला सुनावत म्हणाले... title=

मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या कहाणीबद्दल सगळ्याच लोकांना माहिती आहे. अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी रेखा सोबत अनेक चित्रपट केले. त्यांचा सिनेमा आणि गाणी दोन्हीला लोकांनी पसंती दर्शवली. लोकं या जोडीला ऑफ स्क्रिन आणि ऑन स्क्रिन दोन्ही पद्धतीने पसंत करु लागले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे सेटवरील आपण अनेक किस्से एकले असतील. परंतु त्यांचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. ज्यामध्ये असे समोर आले की, त्यांना रेखा यांची एक गोष्ट आवडायची नाही आणि त्याचा ते राग करायचे.

1976 मध्ये जेव्हा ते दो अंजानेच्या सेटवर भेटले तेव्हा त्यांची केमिस्ट्री पडद्यावर अशी चमकली की, त्यांचे मार्ग कायमचे जोडले गेले. अर्थात ही जोडी पडद्यावर वर्षानुवर्षे दिसली नसेल, पण आजही त्यांच्या पडद्यावरच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

आता आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रेखाच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात या सेटशी संबंधित आणि अमिताभ यांच्याशी संबंधित एक किस्सा लिहिला आहे. त्यावेळेला रेखा 'दो अंजाने'च्या सेटवर वेळेवर येत नसे आणि यामुळे अमिताभ बच्चन फार चिडायचे.

मग एके दिवशी त्यांनी रेखाशी बोलून तिच्या वाईट सवयीबद्दल तिला सांगितले आणि हे शूटिंग गांभीर्याने करायला हवे असे सांगितले. आता हे ऐकल्यानंतर तुम्हीच अंदाज लावा की हे सांगताना अमिताभ यांची स्टाईल कशी असेल. त्यांनी ही गोष्ट रेखाला अशा प्रकारे सांगितली की, रेखाला त्यांची ही गोष्ट मान्य करावीच लागली.

अमिताभ आपल्या कामाच्या बाबतीत किती वक्तशीर आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांची कामाची आवड आणि त्यांची वागणूक पाहून रेखा अमिताभ यांच्यावर खूप प्रभावित झाल्या, त्यानंतर ते दोघे चांगले मित्र बनले.