रेखाच्या आयुष्यात ना कधी प्रेम होतं ना कधी लग्नाचं सुख, लग्नाच्या पहिल्याच वर्षी असं झालं...

रेखा म्हणतात की, ''लग्नाच्या बाबतीत माझं आणि माझ्या आईचं नशिब सारखं आहे.

Updated: Apr 26, 2021, 08:38 PM IST
 रेखाच्या आयुष्यात ना कधी प्रेम होतं ना कधी लग्नाचं सुख, लग्नाच्या पहिल्याच वर्षी असं झालं... title=

मुंबई : बॉलिवूच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा. वयाच्या तीसऱ्या वर्षापासूनच त्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत. रेखा यांना कायमच चर्चेत रहायला आवडतं आणि लोक त्यांना काय म्हणतील याची त्यांना कधीच काळजी नाही. रेखा म्हणतात की, ''लग्नाच्या बाबतीत माझं आणि माझ्या आईचं नशिब सारखं आहे. तिला आणि मला दोघांनाही लग्नाचा आनंद मिळाला नाही. माझं दुर्दैव पहा की, ना माझ्या हातावर प्रेमाची रेषा आहे आणि नाही लग्नाची." काही लोक आशावादी असतात मात्र त्यांच्या नशीबात प्रेमच नसतं''

रेखाचे वडील साउथचे प्रसिद्ध हिरो होते. त्यांचं नाव मिथुन गणेशन होतं. मिथुन गणेशन यांना 'किंग ऑफ रोमान्स' म्हणूनही ओळखलं जात असे. रेखा यांच्या आईचं नाव पुष्पावली होतं आणि त्या देखील एक मोठी नायिका होत्या. दुःखाची गोष्ट म्हणजे तिचा नवरा तिला सोडून गेला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं. आणि यामुळेच रेखा यांचा त्याच्या वडिलांवर आयुष्यभर राग होता. रेखा यांचं पूर्ण नाव 'भानुरेखा गणेशन' आहे, मात्र रेखा यांनी आपल्या नावापुढे कधीच आपलं सरनेम जोडलं नाही.  आणि यांचं कारण होतं . रेखाला त्यांनी आपली मुलगी म्हणून कधीच स्वीकारलं नव्हतं.

प्रत्येकाला माहित आहे की रेखा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होती. जेव्हा जेव्हा हिंदी बॉलिवूडमधील लव्हस्टोरीबद्दल बोललं जातं. तेव्हा-तेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नाव सगळ्यात पहिलं समोर येतं. या दोघांनी 'मिस्टर नटवरलाल', 'सिलसिला', 'दो अंजाने', 'नमक हराम', 'मुकद्दार का सिकंदर' या सिनेमध्ये एकत्र काम केलं आहे. एक काळ असा होता की वर्तमानपत्रात नव्हे, तर मासिकपत्रामध्ये या दोघांविषयी बातम्या छापल्या जायच्या. पण रेखा आणि अमिताभ हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काहीच बोलले नाही.

प्रेमात अयशस्वी असलेल्या रेखा यांनी १९९० मध्ये दिल्लीचे व्यापारी मुकेश अग्रवाल यांची भेट घेतली. घाईघाईने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते अग्रवाल हॉटलाईनचे मालक होते. या दोघांचं जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात लग्न झालं. रेखा आणि मुकेश अग्रवाल यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. यानंतर रेखा यांनी मुकेश यांचं घर सोडलं आणि मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी दिल्लीला जाणं फार कमी केलं.

मुकेशला जास्त काळ रेखाची अनुपस्थिती सहन होत नव्हती. रेखा यांनी चित्रपट सोडून त्याच्या सोबत राहावं अशी त्यांची इच्छा होती पण रेखा यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. रेखाने लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मुकेश यांनी ते इतक्या वाईटरीतीने घेतलं की त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्याआधी मुकेश यांनी रेखाला जे सांगितलं होतं.

जे ऐकुन रेखाच्या पायखालची जमीन सरकली. त्यामुळे रेखाने देखील घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मुकेश यांनी रेखाला आपल्या आयुष्यात कुणीतरी दुसरी व्यक्ती आहे, जिच्यावर मी जिवापाड प्रेम करतो.. असं सांगितलं. यानंतर रेखच्या नवऱ्याने आत्महत्या केली. त्या काळात रेखाबद्दल बरंच काही लिहिले गेलं होतं, परंतु रेखा अजिबात घाबरली नाही.