ऐश्वर्या सलमानला करणार फॉलो, या सिनेमांत डबल रोल

लग्नानंतर अगदी सिलेक्टिव सिनेमे करणारी ऐश्वर्या आता दिसणार नव्या अवतारात..... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 28, 2017, 03:55 PM IST
ऐश्वर्या सलमानला करणार फॉलो, या सिनेमांत डबल रोल  title=

मुंबई : लग्नानंतर अगदी सिलेक्टिव सिनेमे करणारी ऐश्वर्या आता दिसणार नव्या अवतारात..... 

ऐ दिल है मुश्किल या हिट सिनेमानंतर ऐश्वर्या एक नवा सिनेमा घेऊन येत आहे. पण यासाठी ती सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा आहे. सलमान खानने जुडवा आणि प्रेम रतन धन पायो या सिनेमात डबल रोल केला आहे. मीडियात आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या पहिल्यांदा डबल रोल साकारणार आहे. 'रात दिन और' या सिनेमांत ऐश्वर्या डबल कॅरेक्टर प्ले करणार आहे. ऐश्वर्या हल्ली तिचा आगामी सिनेमा 'फन्ने खान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमांत ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आहे. 

काय आहे 'रात और दिन' या सिनेमांत?

दिन और रात हा थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमाची देखील लवकरच शुटिंग सुरू होणार आहे. मात्र अद्याप ऐश्वर्यासोबत कोण असणार याचं नाव कळलेलं नाही. या सिनेमांत ऐश्वर्या संजय दत्तची आई नरगिस दत्त यांची भूमिका साकारताना दिसेल. 

हा सिनेमा 1967 चा रिमेक असणार आहे. मूळ सिनेमाचे दिग्दर्शक सत्येन बोस होते. मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या या सिनेमांत मल्टिपल डिसऑर्डरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाला प्रेरणा अरोरा आणि अर्जुन एन कपूर प्रोड्यूस करणार आहेत. असं सांगितलं जातं की, ऐश्वर्या अशाच कथेच्या शोधात होती.