मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर जेवढा चांगला अभिनेता आहे तेवढाच चांगला तो भाऊ देखील आहे. आपल्या कुटुंबात रणबीर कपूर कुणाच्या सर्वात जास्त जवळ आहे तर ती आहे त्याची बहिण रिद्धिमा. रिद्धिमा म्हणजे की, रणबीर सगळ्यात जास्त काळजी घेणारा भाऊ आहे. रिद्धिमाने वोग मॅगझीनच्या नोव्हेंबर महिन्यातील एडिशनमध्ये भाऊ रणबीर कपूरवर एक लेख लिहीला आहे. या लेखात तिने रणबीरसोबतच्या लहानपणीच्या आठवणी आणि अगदी त्याच्या लव लाईफपर्यंतच्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
तिने लिहीलं आहे की, रणबीरला लहानपणापासूनच अभिनय आवडत होता. त्याच्या या आवडीवर आजोबा राज कपूर यांचा खूप प्रभाव होता. तिने सांगितलं की, रणबीरने आर के बॅनर अंतर्गत असलेले सर्व सिनेमे पाहिले आहेत. रणबीर एक असा नॅचुरल परफॉर्मर आहे जो आपल्या भूमिकेसाठी पूर्ण प्रयत्न करतो.
लहानपणीच्या आठवणींसोबतच तिने आता चर्चेत असलेला रणबीर आणि आलियाचा विषयही त्यामध्ये मांडला आहे. आलियासोबत जर रणबीर खूष असेल तर त्याच्या या आनंदात मी देखील आनंदी आहे. असं रिद्धिमा या लेखात सांगितलं आहे.