जेनेलियाने पोस्ट केली रितेश देशमुखच्या पेटिंगचा पहिला फोटो

पाहा हे खास गिफ्ट 

जेनेलियाने पोस्ट  केली रितेश देशमुखच्या पेटिंगचा पहिला फोटो

मुंबई : नुकतंच जेनेलिया डिसोझाने आपला 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. आता जेनेलिया डिसोझा देशमुखने आपला नवरा आणि अभिनेता रितेश देशमुखचं एक टॅलेंटन जगासमोर आणलं आहे. जेनेलियाने एक सुंदर पेटिंग इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. रितेश देशमुखचा अभिनय तर आपण पाहिलाच आहे. आता तो किती चांगली पेटिंग काढतो हे त्याचं अनोख टॅलेंट समोर आलं आहे. जेनेलियाने हा फोटो कॅप्शनसहीत पोस्ट केला आहे. मला माहित आहे तुम्हाला विचित्र वाटेल की, मी असं काहीतरी पोस्ट करत आहे. मात्र आभार ही एक अशी गोष्टी ज्याला आपण महत्व देत नाही. मात्र मी आता असं काही करणार नाही. मला तुमच्यावर गर्व आहे. 

रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी 

एवढंच काय तर आपल्या नवऱ्याच्या या पेटिंगवर जेनेलियाला भरपूर प्रेम येत आहे. 2012 मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझाने लग्न केलं आहे. जेनेलिया आणि रितेश यांना 2 मुलं आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात जवळीकता वाढत गेली. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. मात्र जेनेलियाने जो विचार केला होता, त्याच्या अगदी विपरीत रितेशचा स्वभाव असल्याने ती दंग राहिली, शिवाय ती इम्प्रेसही झाली. रितेश केवळ जेनेलियासोबतच चांगला वागत होता असे नाही, तर शूटिंगदरम्यान तो तिच्या आई-वडिलांबरोबरही अतिशय चांगल्या प्रकारे बोलत असे. त्यामुळे दोघांची मैत्री घट्ट झाली. हैद्राबाद येथील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रितेश मुंबईत आला. मात्र मुंबईत त्याचे फारसे मन लागले नाही. तो जेनेलियाला सारखे मिस करीत असायचा. जेनेलियालादेखील रितेशपासून दूर जाणे शक्य नव्हते. तीदेखील त्याला सातत्याने मिस करायची. खरे तर एकमेकांना बघताच क्षणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते