'सारे तुझ्याचसाठी' मालिकेतील अभिनेत्रीचं मंगळसूत्र लोकप्रिय

पाहा हे मंगळसूत्र 

'सारे तुझ्याचसाठी' मालिकेतील अभिनेत्रीचं मंगळसूत्र लोकप्रिय  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. दीपवीर पाठोपाठ आता प्रियंका-निकच्या लग्नाची गडबड सुरू होती. हे सगळं असताना छोट्या पडद्यावरचे कलाकार कसे मागे राहतील. सोनी मराठीवर सुरू असलेल्या 'सारे तुझ्याचसाठी' ही लगीनघाई पाहायला मिळत आहे. 

26 नोव्हेंबरला मालिकेत श्रुती आणि कार्तिकच लग्न झालं. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. या फोटोत सगळ्यांच लक्षवेधलं ते श्रुतीच्या मंगळसूत्राने. सोशल मीडियावर श्रुतीच्या मंगळसुत्राला 'झुमका मंगळसूत्र' असं नाव ठेवलं आहे. या मंगळसूत्राला झुमका लावण्यात आला आहे. कानातल्यांवर मॅचिंग असलेल्या या मंगळसूत्राला खूप पसंती मिळत आहे. 

सध्या जिथे दीपवीरचे आऊट फीट सोशल मीडियावर पसंतीला पडत आहेत तिथेच श्रुतीच्या मंगळसूत्राची देखील चर्चा आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमधील अभिनेत्रीचे मंगळसूत्र प्रेक्षकांच्या पसंतीला पडले. पण हे मंगळसूत्र थोडं हटके आहे. 

साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला त्यांचा साखरपुडा, नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं. कार्तिकने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणार नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली. तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला.