Sai Tamhankar 11th Home Video : सई ताम्हणकरची सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चा आहे. सलग दहा घरात राहिल्यानंतर आता सईनं आपल्या हक्काच्या 11 व्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर तूफान चर्चा आहे. यावेळी तिनं द इलॅव्हेन्थ प्लेस नावानं तीन एपिसोडची वेबसिरिज युट्यूबवर प्रदर्शित केली आहे. तिच्या या तीनही व्हिडीओजला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे तिची चर्चा आहे. सध्या तिनं आपल्या या घराविषयी अनेक खुलासे केले आहेत आणि आपल्या चाहत्यांना माहितीही दिली आहे. मुंबईत आपलं एक घरं असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्नही करताना दिसतो. आपली ही धडपड कधी ना कधी तरी फळाला येतेच आणि आप्या पदरी सुंदर आणि आलिशान असे घर पडतेच. त्यावेळी आपला आनंद हा गगनात मावेनासा असतो. आपल्यासाठी ही एक फार मोठी अचिव्हमेंट असते. सईसाठीही तिच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा क्षण आहे.
यावेळी तिनं या आपल्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे यावेळी तिला विचारण्यात आले की तिला मुंबईच्या बाहेर राहायला कुठे आवडेल का? कर्ली टेल्सच्या 59 सेकेंड्स विथ सई या व्हिडीओत ती म्हणाली की, ''हे पटकन सांगता येणार नाही. अशा कुठल्या जागेचा विचारच करू शकत नाही. पण मी मुंबईसोडून दुसरीकडे कुठेच राहू शकले नसते.'' अनेक जणं मुंबईच्या बाहेरही राहायला जातात. पण शेवटी मुंबई ही मुंबईच आहे. त्यामुळे सईला या प्रश्नाचे उत्तर देणे फारच कठीण झाले. सईच्या नव्या घराची झलक सध्या सर्व व्हायरल होते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यापुर्वी सई ही दहा वेगवेगळ्या घरात राहिलेली आहे. सांगलीहून सई ही मुंबईला आली. तिनं मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिच्या अचिव्हमेंट्सकडेही तिचे चाहते फारच उत्सुकतेने पाहतात.
हेही वाचा : धक्कादायक! अभिनेत्याने रस्त्यावरुन चालणाऱ्या कपलला गाडीने उडवलं, महिलेचा मृत्यू
सध्या तिनं रिलिज केलेल्या व्हिडीओंमध्ये तिनं सांगितलं आहे की कशाप्रकारे तिनं हे नवीन घरं घेतलं. काय काय अडचणी आल्या आणि तिनं या घराचा शोध कसा घेतलाय. या घराची लक्झरीही आपल्या या व्हिडीओतून समजेलच.
सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे . तिनं मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसिरिजमधून कामं केली आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावरही जोरात चर्चा असते.