सैराटच्या नावानं चांगभलं : नागराजने शेअर केल्या खास आठवणी

पुन्हा एकदा सैराटची झिंग लागायला सुरूवात झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला 29 एप्रिल रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. सैराट या सिनेमाने नवनवे इतिहास रचले. सैराटच्या नावानं चांगभलं हे नागराज मंजुळेच्या टीमचं ब्रीदवाक्य. हेच ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सैराटचं वादळ निर्माण करत आहे.

सैराटच्या नावानं चांगभलं : नागराजने शेअर केल्या खास आठवणी  title=

मुंबई : पुन्हा एकदा सैराटची झिंग लागायला सुरूवात झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला 29 एप्रिल रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. सैराट या सिनेमाने नवनवे इतिहास रचले. सैराटच्या नावानं चांगभलं हे नागराज मंजुळेच्या टीमचं ब्रीदवाक्य. हेच ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सैराटचं वादळ निर्माण करत आहे.

आतापर्यंतचा असा अनुभव आहे की, सिनेमा प्रदर्शित झाला की किंवा त्या अगोदर त्याचं मेकिंग दाखवलं जातं. पण सैराट हा असा सिनेमा आहे ज्याचं मेकिंग तब्बल सिनेमा प्रदर्शनाच्या 2 वर्षांनी दाखवल जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत कोणत्याच सिनेमाचं मेकिंग दाखवण्यात आलं नाही. हा पहिला सिनेमा आहे ज्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे सैराटच्या नावानं चांगभलं ?

या प्रोग्राममध्ये सैराट सिनेमाचं मेकिंग दाखवण्यात येणार आहे. सैराटचं मेकिंग 29 एप्रिलपासून दर रविवारी दाखवण्यात येणार आहे. यामध्ये अगदी आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर याची निवड कशी झाली तिथपासून हा सिनेमा कसा चित्रित झाला याची माहिती मिळाली आहे. कायम असं म्हटलं जातं की सैराट ही गोष्ट आहे वेडेपणाची. नागराजच्या पॅशनची... या सिनेमानंतर महाराष्ट्रासह देशाने सैराटच्या कलाकारांवर भरभरून प्रेम केलं.