मुंबई : बॉलीवूड स्टार मलायका अरोरा आणि अरबाज खान घटस्फोटानंतर आपआपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आणि दोघंही नव्याने आयुष्याचा आनंद घेत आहेत. दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यावेळी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला याबद्दल प्रश्न विचारला जात होता. जाणून घ्या यावेळी मलायका अरोराचे सासरे आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान काय म्हणाले होते...
बॉलिवूड स्टार्स मलायका अरोरा आणि अरबाज
अरबाज खान आणि मलायका अरोराच्या नात्याच्या प्रश्नावर बोलताना सलीम खान म्हणाले होते की, ते आपल्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. सलीम खान म्हणाले होते, "मी एक लेखक आहे... मला कोणाच्या प्रेमप्रकरणाच्या किंवा विभक्त होण्याच्या बातम्यांबद्दल विचारू नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही."
पुढे बोलताना सलीम खान म्हणाले की, मला याबाबत बोलायचं नाही. यासोबतच मलायकाची आई जोस पॉलीकार्प देखील या विषयावर बोलण्यास इच्छुक नव्हती. घटस्फोटाच्या बातमीबद्दल विचारलं असता ती म्हणाली, "ते मोठे आहेत... हे त्यांचं काम आहे. मला त्यात पडायचं नाही. मला याबद्दल बोलायचं नाही."
अरबाज खान आणि मलायका यांनी १८ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायका यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. अरहान खान सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. दुसरीकडे अरबाज खान आणि मलायका अरोरा बद्दल बोलायचं झालं तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज खान इंटरनॅशनल मॉडेल जॉर्जियाला डेट करत आहे.