मुंबई : सलमान खानचे वडिल आणि बॉलिवूडचे नावाजलेले लेखक सलीम खान यांनी 'राधे' सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान यांनी 'राधे : योर मोस्ट वॉन्टेड' या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Salim Khan first reaction on Salman Radhe Movie ) सलीम खान यांनी यासोबतच त्यांना आवडलेल्या सिनेमांचं देखील कौतुक केलं आहे.
एका मुलाखतीत सलीम खान यांना प्रश्न विचारण्यात आला,'अनेकांनी सलमान खानचा राधे सिनेमा आणि या अगोदर आलेल्या सिनेमांमध्ये समानता दिसत आहे.' त्यावर सलीम खान यांनी उत्तर दिलं की,'या अगोदर आलेला दबंग 3 हा सिनेमा वेगळा आहे. बजरंगी भाईजान सिनेमा चांगला होता. तसेच वेगळा होता. राधे अजिबातच चांगला सिनेमा नाही. मात्र कर्मशिअल सिनेमाची एक जबाबदारी असते. प्रत्येकाला पैसे मिळावेत. अगदी आर्टिस्ट ते निर्माता, डिस्ट्रीब्यूटर, एक्झिबिटर आणि स्टेकहोल्डरला पैसे मिळायला हवेत. '
या मुलाखतीत सलीम खान यांनी सिनेसृष्टीतील रायटर यांच्याबद्दल देखील सांगितलं. 'सिनेसृष्टीत उत्तम लेखक नाहीत हा खूप मोठा प्रश्न आहे. याचं कारण आहे लेखकांनी कधी उर्दू साहित्य वाचलेलंच नाही.'
अभिनेता कमाल आर खान (KRK) याला भाईजानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणे चांगलेच महागात पडले आहे. सलमान खानने कमाल विरोधात मुंबई हाय कोर्ट मध्ये मानहानिचा दावा दाखल केला आहे. सोमवारी सलमान खानच्या अधिकृत टिमतर्फे कमाल आर खानला नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच सलमान खानची टिम गुरुवारी सिविल कोर्टाच्या एका ऍडिशनल सेशन जजच्या समोर तात्काळ याची सुनावणी केली जाणार असल्याचे बोलण्यात येत आहे.
सलमान खान तर्फे नोटिस बजावल्या नंतर कमाल खानने ट्विट करत लिहले आहे की,”डियर सलमान खान मानहानिची केस तुमच्या हताश आणि नाराज होण्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोवर्ससाठी रिव्ह्यू करतो आणि माझे काम करतो. माला तुमच्या चित्रपटाचे रिव्ह्यू बनवण्यापासून रोखण्यापेक्षा तुम्ही काही च्ंनग्ले सिनेमा बनवला पाहिजे. मी खरेपणासाठी नेहमी उभा रहेण आणि लढेल. धन्यवाद… ”