या दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३'

 सोनी टीव्हीवरील 'दस का दम ३' शो मधून सलमान पुन्हा घराघरात दिसणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 8, 2018, 06:47 PM IST
 या दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३' title=

मुंबई : सलमान खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 'बिग बॉस' नंतर सलमान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. सोनी टीव्हीवरील 'दस का दम ३' शो मधून सलमान पुन्हा घराघरात दिसणार आहे. 

आधी प्रोमो शूट 

बॉलीवुड लाईफ.कॉमच्या वृत्तानुसार ९ फेब्रुवारीला सलमान 'दस का दम'  तीसऱ्या सीझनचे प्रोमो शुट करणार आहे.

या हफ्त्यात आधी प्रोमो शूट होणार आहे.

त्यानंतर ऑडिशनची घोषणादेखील सलमान करणार आहे. या शोसाठी एक अॅपदेखील लॉन्च करण्यात आले आहे.

शोचा पहिल्या एपिसोडचे प्रसारण ९ मेला होणार आहे. 
 
 फेमस रिएलिटी 'गेम शॉ पॉवर ऑफ १० चे हे हिंदी (भारतीय) वर्जन आहे.

५ प्रश्नांची उत्तरे 

 या गेम शो मध्ये स्पर्धकांना १० कोटी रुपयांपर्यतची रक्कम मिळू शकते.

फक्त पाच प्रश्नांची उत्तरे देऊन १० कोटी रुपयांपर्यंत कमाई करता येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.