अर्पिताच्या घरी असा विराजमान झाला सलमान खानचा गणपती!

सलमान खान गेली १४ वर्ष वांद्राच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतो.

Updated: Aug 26, 2017, 02:30 PM IST
अर्पिताच्या घरी असा विराजमान झाला सलमान खानचा गणपती! title=

मुंबई : सलमान खान गेली १४ वर्ष वांद्राच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतो.

पण यंदा पहिल्यांदा त्याच्या राहत्या घरी  गणपतीची प्रतिष्ठापना न करता  बहिण अर्पिताकडे खान कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करत आहेत.  सलमान खानदेखील 'टायगर जिंदा है' या चित्रपटासाठी दुबईत व्यस्त आहे.  पण गणेशोत्सवासाठी शुटिंगमधून एका दिवसासाठी तो  भारतात परतला आहे. सलामान खानने काल गणेश चतुर्थीदिवशी अर्पिताच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. 

  अर्पिताच्या नव्या घरी बसलेल्या गणपतीची आरास कशी केली आहे ? नेमकी मूर्ती कशी आहे ? याबाबतची तुमच्या मनातील उत्सुकता पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा....   

    
मोगर्‍याच्या फुलांच्या पांढर्‍या शुभ्र आरासामध्ये गणेशमूर्ती खुलून दिसत आहे. इको फ्रेंडली स्वरूपात आरास केलेल्या  इको फ्रेंडली गणपतीचे विसर्जनही खास आर्टीफिशियल तलावामध्येच केले जाते. अर्पिताने यंदाही दीड दिवसाचा गणपती ठेवल्याने आज या गणपतीचे विसर्जन केले जाईल.